दिल्लीतील महिला उपनिरीक्षक 20 लाखांची लाच घेताना अडकली; गृह मंत्रालयाशी संबंधित प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

0
महिला पोलीस उपनिरीक्षक अटकेत! 20 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडली; गृह मंत्रालयाशी संबंधित प्रकरण

महिला पोलीस उपनिरीक्षक अटकेत! 20 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडली; गृह मंत्रालयाशी संबंधित प्रकरण

Delhi Crime News: महिला पोलीस उपनिरीक्षक नीतू बिष्ट हिला 20 लाखांची लाच घेताना अटक; गृह मंत्रालयाशी संबंधित बदली आणि भरतीप्रकरणी 50 लाखांची लाच मागितल्याचा आरोप.

सायली मेमाणे

पुणे ३१ जुलै २०२५ : नवी दिल्ली – गृह मंत्रालयाशी संबंधित बदली व भरती प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षक नीतू बिष्ट हिला 20 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पश्चिम विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रं दक्षता विभागाकडे सोपवण्यात आली आहेत.

सध्या एसआय नीतू बिष्ट पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिला अधिकारी दिल्ली पोलिसांच्या 2014 बॅचची असून, ती पश्चिम विहार भागात राहत होती. तिच्यावर गृह मंत्रालयाशी संबंधित एका व्यक्तीच्या बदली आणि भरतीसाठी 50 लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे. त्यातील 20.50 लाख रुपये तिने स्वीकारले, तेव्हा दक्षता पथकाने तिला सापळ्यात पकडलं.

या प्रकरणात तक्रारदाराकडून ठोस पुरावे सादर करण्यात आले होते. तक्रारीनुसार, आरोपीने एक डॉक्टर आणि तिच्या मुलाला पोलीस ठाण्यातील खोलीत बोलावलं. तेथे त्यांच्यावर मानसिक व शारीरिक दबाव टाकण्यात आला. आरोपीने धमकी देत लाचेची रक्कम देण्यास भाग पाडलं. प्राथमिक तपासात हे उघड झालं की, आरोपी महिला पोलिसाला या व्यवहारात एका पुरुष सहकाऱ्याचीही मदत मिळाली असण्याची शक्यता आहे. याच दिशेने तपास सुरु आहे.

दक्षता विभागाच्या सूत्रांनुसार, या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्यात येत आहे. विभागात भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारण्यात आले असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिस दलात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना स्थान नाही, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

सध्या आरोपीचा जबाब नोंदवला जात असून, तिच्या मोबाइल फोन, कागदपत्रं आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. यासोबतच तिच्या सहकार्याची भूमिका तपासली जात आहे. प्रकरण गृह मंत्रालयाशी संबंधित असल्याने वरिष्ठ स्तरावरून देखील याकडे लक्ष दिलं जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed