पुण्यात मौजमजेसाठी चोरल्या ५ दुचाकी; समर्थ पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

0
पुण्यात मौजमजेसाठी चोरल्या ५ दुचाकी; समर्थ पोलिसांनी आरोपीस पकडले

पुण्यात मौजमजेसाठी चोरल्या ५ दुचाकी; समर्थ पोलिसांनी आरोपीस पकडले

पुण्यात समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत मौजमजेसाठी ५ दुचाकी चोरल्याचा गुन्हा उघडकीस; आरोपी सुजल जगतापला अटक, चौकशीत इतर ४ चोरीच्या दुचाकी जप्त.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे ७ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजमजेgसाठी तब्बल पाच दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. २७ ते २८ जुलै २०२५ दरम्यान फिर्यादीने यांच्या घराच्या खाली पार्क केलेली यमाहा कंपनीची मोटारसायकल चोरी झाली होती. यावरून समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १८१/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता, राजेवाडी परिसरातील सुजल जीतेश जगताप याने सदर दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. कात्रज परिसरात सापळा रचून आरोपीस चोरीच्या दुचाकीसह अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने आपल्या विधीसंघर्षित बालक मित्राच्या मदतीने मोटारसायकल चोरली होती. याच आरोपीकडून अधिक चौकशी केल्यावर, त्याने पुणे शहरात यापूर्वी चार दुचाकी चोरल्याचे मान्य केले. पोलिसांनी एकूण पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून, यामध्ये बंडगार्डन आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी इम्रान शेख, शरद घोरपडे, रोहीदास वाघेरे, संतोष पागार आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीविरोधात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *