बालेवाडीमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा धोकादायक प्रकार उघड; मोठा अपघात टळला

0
पुण्याच्या बालेवाडीमध्ये एका गॅस सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधपणे रिफिलिंग केल्याचा प्रकार उघड.

पुण्याच्या बालेवाडीमध्ये एका गॅस सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधपणे रिफिलिंग केल्याचा प्रकार उघड.

पुण्याच्या बालेवाडीमध्ये एका गॅस सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधपणे रिफिलिंग केल्याचा प्रकार उघड. पोलिसांकडून तत्काळ कारवाई, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

सायली मेमाणे

पुणे १० जुलै २०२५ : पुणे : पुण्यातील बालेवाडी परिसरात जीवघेण्या अपघातास निमंत्रण देणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका गॅस सर्व्हिस सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये अवैधपणे गॅस रिफिलिंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस शिपाई अमोल गोरे यांनी यासंदर्भात बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, बालेवाडीतील एका गॅस सेंटरमध्ये घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये रिफिलिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करत सेंटरवर छापा टाकून या अवैध प्रकाराचा पर्दाफाश केला.

घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणे हा अग्निशमन आणि सुरक्षा नियमांचा सरळ उल्लंघन असून, गॅस रिफिलिंगसारख्या प्रक्रियेत जर योग्य खबरदारी घेतली गेली नाही तर मोठ्या स्फोटाचा धोका संभवतो. यामुळे अशा प्रकारांना ‘गंभीर गुन्हा’ मानले जाते. परंतु तरीही संबंधित आरोपीने कोणतीही परवानगी अथवा सुरक्षा यंत्रणा न वापरता सर्रासपणे गॅस रिफिलिंग करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.

या प्रकरणाची माहिती स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचताच, परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांनी सुचवले की, वेळेत कारवाई झाली नसती, तर एखादा प्रचंड स्फोट होऊन जीवितहानी झाली असती. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

संबंधित गॅस सेंटरवर लवकरच अधिक तपास करण्यात येणार असून, अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील इतर केंद्रांची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed