वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीत 1 लाखांची मदत भाजप नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचा आदर्श उपक्रम

वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीत 1 लाखांची मदत भाजप नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचा आदर्श उपक्रम
भाजपचे सरचिटणीस आणि नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करत 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्त केला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
पुणे ०३ जून २०२६ : पुण्यातील भाजपचे सरचिटणीस आणि स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. त्यांच्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले असून समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचत, परकीय चलनाची बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रवींद्र साळेगावकर यांनी वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे फलक न लावण्याचे आवाहन केले आणि त्या खर्चातून वाचलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे ठरवले.
या निर्णयानुसार साळेगावकर यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्त केला. सामाजिक जबाबदारी जपत केलेल्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. यावेळी गणेश बगाडे, हेमंत डाबी, सौरभ कुंडलिक आणि मंगेश रंगे उपस्थित होते.
रवींद्र साळेगावकर हे भाजपचे दीर्घकाळापासून कार्यरत असलेले एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पुणे महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली. शिवाजीनगर परिसरात ते गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांशी सातत्याने संपर्कात आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साळेगावकर यांनी शिवाजीनगर परिसरातील सुमारे 140 हून अधिक सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम राबवली आहे. या उपक्रमांतर्गत टाक्यांमधील कचरा, पालापाचोळा, दगड, माती आणि शेवाळे काढून संपूर्ण टाकी स्वच्छ करण्यात येते. त्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी विशेष फवारणी केली जाते.
राजेश बंगला, नकुल अपार्टमेंट, वीर नेताजी सोसायटी, दख्खन पाटबंधारे गृह रचना सोसायटी, अशोक सोसायटी, चंद्रलोक अपार्टमेंट यांसह अनेक सोसायट्या आणि निवासी संकुलांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला असून नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रवींद्र साळेगावकर यांनी भाजपमधील आपल्या 32 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासातील अनुभव सांगितले होते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने काम करत राहणार असल्याची भूमिकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
वाढदिवसाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केलेली आर्थिक मदत ही केवळ देणगी नसून सामाजिक जबाबदारी आणि लोकहिताची भावना जपणारा आदर्श उपक्रम म्हणून पाहिली जात आहे. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare