अदाणी समूहातील गुंतवणुकीत अर्थ मंत्रालयाचा हस्तक्षेप नाही; LIC चे ठाम उत्तर – “सर्व आरोप भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी”

0
अदाणी समूहातील गुंतवणुकीत अर्थ मंत्रालयाचा हस्तक्षेप नाही; LIC चे ठाम उत्तर – “सर्व आरोप भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी”

अदाणी समूहातील गुंतवणुकीत अर्थ मंत्रालयाचा हस्तक्षेप नाही; LIC चे ठाम उत्तर – “सर्व आरोप भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी”


LIC ने स्पष्ट केले आहे की अदाणी समूहातील गुंतवणूक ही पूर्णपणे स्वायत्त आणि धोरणानुसार आहे. अर्थ मंत्रालयाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे संस्थेने सांगितले असून वॉशिंग्टन पोस्टच्या आरोपांना खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.

सायली मेमाणे

पुणे २५ ऑक्टोबर २०२५ : मुंबई : अदाणी समूहातील गुंतवणुकीवरून निर्माण झालेल्या वादाला भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) स्पष्ट आणि ठाम उत्तर दिले आहे. कंपनीने म्हटले आहे की, तिच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर ना अर्थ मंत्रालयाचा, ना इतर कोणत्याही संस्थेचा प्रभाव आहे. सर्व गुंतवणुकीचे निर्णय हे संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणांनुसार आणि सखोल आर्थिक विश्लेषणावर आधारित आहेत.

LIC ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, “अदाणी समूहातील गुंतवणूक ही कोणत्याही बाह्य दबावाखाली केली गेलेली नाही. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून कोणतेही निर्देश किंवा हस्तक्षेप झालेले नाहीत. आमच्या सर्व गुंतवणुकी विद्यमान कायदे, नियामक तत्त्वे आणि आंतरिक धोरणांच्या चौकटीत राहून केल्या जातात.”

LIC ने पुढे म्हटले आहे की, “आमचे सर्व निर्णय कंपनीच्या दीर्घकालीन आर्थिक हितासाठी, भागधारकांना लाभ मिळावा या उद्देशाने घेतले जातात.”

अमेरिकन वृत्तसंस्था वॉशिंग्टन पोस्ट ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, LIC ने अदाणी समूहात गुंतवणूक ही अर्थ मंत्रालयाच्या दबावाखाली केली. मात्र LIC ने या सर्व आरोपांना ‘बिनबुडाचे’ ठरवत म्हटले आहे की, “हे आरोप केवळ LIC आणि भारताची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी केले गेले आहेत.”

त्या अहवालात असा उल्लेख करण्यात आला होता की, LIC ने मे 2025 मध्ये अदाणी पोर्ट्स अँड एसईझेड (APSEZ) मध्ये 570 दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली होती. परंतु LIC ने स्पष्ट केले की, “APSEZ ही भारतातील AAA क्रेडिट रेटिंग असलेली अग्रगण्य कंपनी आहे. अशा दर्जेदार कंपनीत गुंतवणूक करणे हे नियमित आणि आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय आहे.”

LIC हा भारतातील सर्वात मोठा संस्थात्मक गुंतवणूकदार आहे, ज्याची एकूण मालमत्ता ₹41 लाख कोटींहून अधिक आहे (सुमारे 500 अब्ज अमेरिकन डॉलर). 2025 च्या सुरुवातीस LIC कडे 351 सार्वजनिक सूचीबद्ध समभागांमध्ये गुंतवणूक आहे, ज्यात जवळपास सर्व मोठे उद्योगगट आणि क्षेत्रांचा समावेश आहे.

अदाणी समूहातील LIC ची गुंतवणूक ही समूहाच्या एकूण कर्जाच्या 2% पेक्षा कमी आहे. इक्विटी गुंतवणुकीच्या बाबतीत LIC ची सर्वाधिक गुंतवणूक अदाणी समूहात नसून –

  • रिलायन्स इंडस्ट्रीज: 6.94% (₹1.33 लाख कोटी)
  • ITC लिमिटेड: 15.86% (₹82,800 कोटी)
  • HDFC बँक: 4.89% (₹64,725 कोटी)
  • SBI: 9.59% (₹79,361 कोटी)

या आकडेवारीवरून LIC चे फंड व्यवस्थापन किती मजबूत आणि विविधीकरण असलेले आहे, हे स्पष्ट होते.LIC ने सांगितले आहे की, 2014 पासून तिची देशातील टॉप 500 कंपन्यांमधील गुंतवणूक दहापट वाढली आहे. ती ₹1.56 लाख कोटींवरून ₹15.6 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. या वाढीमुळे LIC चे पोर्टफोलिओ अधिक स्थिर आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मजबूत बनले आहे.

LIC ने स्पष्ट केले की, “आम्ही स्वतंत्र संस्थात्मक गुंतवणूकदार आहोत. कोणत्याही बाह्य राजकीय किंवा प्रशासकीय प्रभावाखाली आमचे निर्णय होत नाहीत. सर्व आरोप हे दिशाभूल करणारे असून संस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे.”


LIC ची एकूण मालमत्ता ₹41 लाख कोटींपेक्षा जास्त

LIC कडून अदाणी समूहातील गुंतवणुकीवर स्पष्ट भूमिका

अर्थ मंत्रालय किंवा इतर संस्थेचा कोणताही हस्तक्षेप नाही

सर्व गुंतवणूक कायदेशीर आणि नियामक तत्त्वांनुसार

वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालातील सर्व आरोप नाकारले

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed