धाराशिवमध्ये 140 कोटींच्या कामावरून राजकीय संघर्ष; ओमराजे निंबाळकर आणि राणाजगजीतसिंह पाटील आमनेसामने

0
धाराशिवमध्ये 140 कोटींच्या कामावरून राजकीय संघर्ष; ओमराजे निंबाळकर आणि राणाजगजीतसिंह पाटील आमनेसामने

धाराशिवमध्ये 140 कोटींच्या कामावरून राजकीय संघर्ष; ओमराजे निंबाळकर आणि राणाजगजीतसिंह पाटील आमनेसामने

Dharashiv Political Clash: शहरातील 140 कोटी रुपयांच्या विकासकामांवरील स्थगितीमुळे धाराशिवमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या बॅनरबाजीमुळे वाद चिघळला. शिवसेनेचे सुधीर पाटील आक्रमक.

सायली मेमाणे

पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : धाराशिव शहरात विकासकामांच्या स्थगितीवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. शहरातील तब्बल 140 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी करत आपली भूमिका ठळकपणे मांडली असून, या वादात आता शिवसेनाही उतरली आहे.

या स्थगितीमुळे शहरातील अनेक प्रलंबित प्रकल्प आणि नव्या कामांवर परिणाम होणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कामाच्या स्थगितीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार पाटील यांच्यावर शहरातील विकास थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी याउलट, “कामे राजकीय हेतूने आणून निधीचे चुकीचे वाटप करण्यात आले आहे,” असा प्रत्यारोप केला.

या वादात आता शिवसेनाचाही प्रवेश झाला असून, जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, “हे दोघेही एकच आहेत. कधी कामं आणतात आणि काही दिवसांत तीच कामं रद्द करतात. धाराशिवच्या विकासाचा राजकीय खेळ करण्यात दोघेही गुंतले आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

या सर्व प्रकरणामुळे धाराशिवमधील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद वाढत चालला आहे. शहरात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करून आपापली बाजू मांडली आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, स्थगिती मिळालेल्या कामांमध्ये रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, आणि काही महत्त्वाचे नागरी प्रकल्प यांचा समावेश असल्याचे समजते.

धाराशिवसारख्या वाढत्या शहराला विकासकामांची नितांत गरज असताना, राजकीय वादामुळे ही कामं अडकणे हे नागरिकांसाठी दुर्दैवी ठरले आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी लवकरच तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, धाराशिवमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा मुद्दा राजकीय रंग घेत आहे. प्रत्येक पक्ष आपली भूमिका दाखवण्यासाठी संघर्ष करत आहे, मात्र शेवटी याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

या घटनाक्रमामुळे धाराशिवचा राजकीय तापमान वाढलं असून, पुढील काही दिवसांत या वादाची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed