पालघर सातिवली गावात स्मशानभूमीत अघोरी पूजा; मांत्रिक पळाला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

0
पालघर सातिवली गावात स्मशानभूमीत अघोरी पूजा; मांत्रिक पळाला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

पालघर सातिवली गावात स्मशानभूमीत अघोरी पूजा; मांत्रिक पळाला, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

पालघरच्या सातिवली गावात स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला. मांत्रिक पळून गेला तर सहभागी व्यक्तीने ग्रामस्थांशी अरेरावी केली. गावकऱ्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली.

सायली मेमाणे

पुणे ११ ऑगस्ट २०२५ : पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सातिवली गावात अघोरी पूजा आणि जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटना स्मशानभूमी परिसरातील ओहोळा लगतच्या खडकावर घडली. अघोरी पूजेत पिठाची बाहुली, लिंबू, चाकू, पांढरी टोपी, बिडी-सिगरेट, कोंबड्याची पिसे, अबीर, गुलाल आणि अगरबत्ती यासारखं साहित्य आढळून आलं.

गावातील एका शेतकऱ्याच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्ती अध्यक्ष, महिला व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. मात्र ग्रामस्थ येत असल्याचं समजताच अघोरी पूजा करणारा मांत्रिक घटनास्थळावरून पळून गेला. पूजेत सहभागी असलेल्या अशोक बात्रा याने ग्रामस्थांशी हुज्जत घालत अरेरावी केली आणि तेथून निघून गेला.

ग्रामस्थांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली; मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत, यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकारामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता पोलिस नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed