पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ‘मिसिंग लिंक’वर नियमभंग महापौरांच्या फोटोमुळे दुहेरी निकषांचा आरोप

0
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ‘मिसिंग लिंक’वर नियमभंग महापौरांच्या फोटोमुळे दुहेरी निकषांचा आरोप

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ‘मिसिंग लिंक’वर नियमभंग महापौरांच्या फोटोमुळे दुहेरी निकषांचा आरोप

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर वाहन थांबवून फोटो काढल्याने पिंपरी-चिंचवड महापौरांवर टीका. सेल्फी घेणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, नागरिकांचा संताप.

पुणे ०५ मे २०२६ : महाराष्ट्र दिनी लोकांसाठी खुला झालेला पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सध्या सेल्फी आणि रिल्सच्या ट्रेंडमुळे चर्चेत आला आहे. जगातील सर्वात रुंद बोगदा आणि देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, सुरक्षेचे नियम मोडून वाहन थांबवून छायाचित्रे काढण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मात्र, याच ठिकाणी पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी वाहन थांबवून फोटो काढल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

सोमवारी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे हे मुंबईत एका बैठकीसाठी जात असताना ‘मिसिंग लिंक’वरील पुलाच्या भव्यतेने प्रभावित झाले. त्यांनी वाहन थांबवून छायाचित्रे काढली आणि ती सोशल मीडियावर पोस्ट करत प्रकल्पाचे कौतुक केले. “विकास केवळ दिसत नाही, तो प्रत्येक प्रवासात जाणवतो,” असा संदेश त्यांनी पोस्टमध्ये दिला. मात्र, ज्या ठिकाणी सामान्य वाहनचालकांना थांबण्यास कडक बंदी आहे, त्याच ठिकाणी लोकप्रतिनिधीने नियम मोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या हाय-स्पीड कॉरिडॉरवर ताशी 100 ते 120 किमी वेगाने वाहने धावत असतात. अशा परिस्थितीत अचानक वाहन थांबवणे हे अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रकल्प सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 20 वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. सलग काही दिवसांपासून सेल्फी घेण्यासाठी थांबणाऱ्यांची गर्दी कायम असल्याने पोलिसांनी कडक इशारे दिले आहेत.

महामार्ग पोलिसांच्या कारवाईदरम्यान सामान्य नागरिकांवर दंड आकारला जात असताना, महापौरांच्या कृतीवर कारवाई होणार का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. “नियम फक्त सामान्यांसाठीच का?” असा संतप्त सवाल अनेकांनी विचारला आहे. काहींनी पोस्टवर थेट टीका करत दुहेरी निकषांचा आरोप केला आहे.

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, अभियांत्रिकी दृष्ट्या हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. याच आकर्षणामुळे पर्यटक आणि वाहनचालक येथे फोटो काढण्यासाठी थांबत आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या वादामुळे लोकप्रतिनिधींनी स्वतः नियमांचे पालन करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण करावा, अशी मागणी पुढे येत आहे. नियमभंग करणाऱ्यांवर समान कारवाई झाली पाहिजे, अन्यथा प्रशासनाची विश्वासार्हता कमी होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अधिकृत कारवाईबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी सोशल मीडियावरील चर्चेमुळे विषय चांगलाच गाजत आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *