फक्त ३.५ लाखांत ४० दिवसाच्या बालिकेची विक्री; सहा आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक

0
येरवडा पोलिसांकडून सहा आरोपींना अटक

येरवडा पोलिसांकडून सहा आरोपींना अटक

पुण्यात केवळ ३.५ लाखांत ४० दिवसांच्या बालिकेची विक्री; येरवडा पोलिसांनी पालक, मध्यस्थ आणि महिला खरेदीदारासह सहा आरोपींना अटक केली.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे ७ जुलै २०२५ – फक्त साडेतीन लाख रुपयांच्या मोबदल्यात अवघ्या ४० दिवसांच्या बालिकेची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तत्पर कारवाई करत पालक, मध्यस्थ व विकत घेणाऱ्या महिलेसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.

फिर्यादी पोलीस हवालदार सचिन लहु गवळी (वय ४२ वर्षे), येरवडा पोलीस ठाणे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना दिनांक २ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान घडली. आरोपींनी कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रीया न पार पाडता संगनमत करून मानवी अपव्यापाराच्या हेतूने ही बालिका विक्री केली.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

मिनल ओंकार सपकाळ (30, घरकाम)

ओंकार औदुंबर सपकाळ (29, टुर मॅनेजमेंट)

साहिल अफजल बागवान (27, भाजी विक्रेता)

रेश्मा शंकर पानसरे/अवताडे (34, मेस चालवणारी)

सचिन रामा अवताडे (44, चालक)

दिपाली विकास फटांगरे (32, शिवणकाम)

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 143(2), 143(3), 143(4), 3(5) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 75, 80, 81, 87 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींना दिनांक ४ जुलै रोजी १६:१५ वाजता अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक लामखडे यांच्या नोंदणीखाली, तसेच तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed