फ्लाइटमध्ये भारतीय प्रवाशाचा धुमाकूळ! हवेतच सहप्रवाशावर हल्ला, VIDEO VIRAL

0
फ्लाइटमध्ये भारतीय प्रवाशाचा धुमाकूळ! हवेतच सहप्रवाशावर हल्ला

फ्लाइटमध्ये भारतीय प्रवाशाचा धुमाकूळ! हवेतच सहप्रवाशावर हल्ला

अमेरिकेतील फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये भारतीय वंशाच्या इशान शर्माने सहप्रवाशावर हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार फ्लाइटमध्ये हवेत असतानाच घडला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सायली मेमाणे

पुणे ४ जुलै २०२५ : अमेरिकेतील फ्रंटियर एअरलाइन्सच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय वंशाच्या इशान शर्माने फ्लाइटमध्ये प्रवास करत असताना सहप्रवाशी कीनू इव्हान्सवर अचानक हल्ला केला. ही घटना फिलाडेल्फिया ते मियामी या प्रवासादरम्यान घडली असून, फ्लाइट हवेत असताना दोघांमध्ये वाद उफाळून भांडणाचे रूप धारण झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, इशान शर्मा आणि कीनू इव्हान्स यांच्यात वाद सुरु झाला आणि तो काही क्षणातच शारीरिक झटापटीत बदलला. व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांचा गळा धरून झुंजताना दिसत आहेत. विमानातील इतर प्रवाशांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण वाद अधिकच चिघळला. विमान मियामी विमानतळावर पोहोचल्यावर इव्हान्सने इशानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याने आरोप केला की, इशानने कोणत्याही कारणाशिवाय त्याच्यावर हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

तक्रारीनंतर पोलिसांनी इशान शर्माला अटक केली आणि त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जॅक्सन वेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला टर्नर गिलफोर्ड नाईट करेक्शनल सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अधिक तपास सुरू केला असून, फ्लाइटमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर प्रवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत.

इव्हान्सच्या म्हणण्यानुसार, तो आपली जागा शांततेत बसून होता आणि इशानने अचानक आरडाओरडा करत त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. इशानचे वर्तन असामान्य होते आणि तो मानसिकदृष्ट्या असंतुलित वाटत होता, असेही इव्हान्सने सांगितले. यामुळे पोलिसांनीही मानसिक आरोग्य चाचणीचा भाग तपासणीसाठी समाविष्ट केला आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. विमानातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेकांनी फ्रंटियर एअरलाइन्सवर टीका केली असून, अशा प्रकारच्या गंभीर घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. एअरलाइन्सने मात्र यावर अद्याप अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

या घटनेमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानप्रवासातील सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअरलाईन कंपन्यांनी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इशान शर्मावर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed