मतदान पार, निकालाची धाकधूक! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

0
मतदान पार, निकालाची धाकधूक! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

मतदान पार, निकालाची धाकधूक! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद


पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. 219 जागांसाठी 827 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.


पुणे ०८ जानेवारी २०२६ : चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शनिवारी शांततेत पार पडली. सकाळी साडेसातपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर जिल्ह्यातील तब्बल 827 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतदान संपताच निकालाची उत्कंठा वाढली असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली आहे.

पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. ग्रामीण सत्ताकारणाची दिशा ठरवणारी ही लढत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येत्या सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यानंतर काही तासांतच निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या दोन रात्री अनेक उमेदवारांसाठी अक्षरशः वैऱ्याच्या ठरणार आहेत.

या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 73 जागा आणि पंचायत समित्यांच्या 146 जागा अशा एकूण 219 जागांसाठी मतदान झाले. या 219 जागांसाठी तब्बल 827 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी 299 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर पंचायत समित्यांच्या 146 जागांसाठी 528 उमेदवारांनी निवडणूक लढवली. प्रत्येक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली.

तालुकानिहाय विचार करता जिल्हा परिषद निवडणुकीत इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 41 उमेदवार रिंगणात होते, तर दौंड तालुक्यात 34 उमेदवारांनी निवडणूक लढवली. बारामती तालुक्यात 32, हवेलीमध्ये 25, जुन्नरमध्ये 24 तर वेल्हे तालुक्यात केवळ 8 उमेदवार रिंगणात होते. पंचायत समिती निवडणुकीतही इंदापूर तालुक्याने आघाडी घेत 72 उमेदवार रिंगणात उतरवले, तर खेड तालुक्यात 60 उमेदवारांनी निवडणूक लढवली. जुन्नर, शिरूर, बारामती आणि हवेली तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर उमेदवार असल्याने चुरशीच्या लढती झाल्या.

चार वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे ग्रामीण राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक विकास, पाणीप्रश्न, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून उमेदवारांनी प्रचार केला होता. मतदान प्रक्रिया एकूणच शांततेत पार पडली असली तरी निकाल कोणाच्या बाजूने लागणार, जिल्हा परिषदेची सत्ता कोणाच्या हाती जाणार आणि पंचायत समित्यांमध्ये कोणते पक्ष आघाडीवर राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही तासांतच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण सत्ताकारणाचा कौल स्पष्ट होणार असून त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed