भयंकर! ठाणे जिल्हा हादरला; भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर बलात्कारानंतर हत्या, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले

भयंकर! ठाणे जिल्हा हादरला; भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर बलात्कारानंतर हत्या, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले
ठाण्यातील भिवंडी तालुक्यात 65 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. मृतदेह शेतात सापडला; चोरीचा हेतू नसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑक्टोबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका एका भयंकर घटनेमुळे हादरला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. मृत महिलेचा मृतदेह तिच्या स्वतःच्या शेतात सापडला, त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक राहुल झाल्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या गळ्यात सुमारे 5 ते 6 तोळे सोन्याचे दागिने होते, जे तिच्या अंगावरच आढळले. त्यामुळे हा गुन्हा चोरीसाठी नसावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या आरोपीकडून सखोल चौकशी सुरू असून, त्याच्यावर बलात्कार आणि खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू ठेवत घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात याच आठवड्यात आणखी एका गंभीर घटनेने खळबळ उडवली होती. कापूरबावडी परिसरात 17 वर्षीय मुलीला तिच्या मित्राने पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पीडित मुलगी सध्या गंभीर अवस्थेत उपचाराधीन आहे.
या दोन घटनांनी ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter