वर्ल्ड कप विजयानंतर जेमिमा रोड्रिग्सची Brand Value झेपावली; १००% वाढ, आता कोटींचे करार

0
वर्ल्ड कप विजयानंतर जेमिमा रोड्रिग्सची Brand Value झेपावली; १००% वाढ, आता कोटींचे करार

वर्ल्ड कप विजयानंतर जेमिमा रोड्रिग्सची Brand Value झेपावली; १००% वाढ, आता कोटींचे करार

ICC महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जेमिमा रोड्रिग्सची Brand Value दुपटीने वाढली. प्रति ब्रँड ७५ लाख ते १.५ कोटींची फी; मोठ्या कंपन्यांकडून नवे करार. स्मृती मंधाना अजूनही भारतातील सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रिकेटर.

सायली मेमाणे

६ ऑक्टोबर २०२५ : भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 मध्ये पहिल्यांदाच ICC महिला वनडे वर्ल्ड कप जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी मिळवलेल्या विजयाने देशभरात आनंद लहर पसरली. 2005 आणि 2017 मध्ये अंतिम सामन्यात अपयशाला सामोरे गेल्यानंतर तब्बल दोन दशकांनी मिळालेल्या या यशाने क्रिकेटप्रेमी भावुक झाले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीमने दमदार पुनरागमन करत इतिहास रचला. या विजयाचा सर्वात मोठा परिणाम खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यू आणि स्पॉन्सरशिपवर होताना दिसत आहे. त्यातही सर्वाधिक फायदा जेमिमा रोड्रिग्सला झाला आहे.

जेमिमाने वर्ल्ड कपमध्ये उत्तम कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने नाबाद 127 धावा झळकावत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. तिच्या या इनिंगने जागतिक ब्रँड्सचे लक्ष वेधून घेतले. तंत्रज्ञान, वाहन, क्रीडा, पेय पदार्थ आणि फिनटेकसारख्या क्षेत्रातील कंपन्यांनी तिच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. यामुळे तिची Brand Value तब्बल 100 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे.

JSW Sports चे चीफ कमर्शियल ऑफिसर यांच्या माहितीनुसार, जेमिमा आता प्रति ब्रँड 75 लाख ते 1.5 कोटी रुपये इतकी फी आकारत आहे. वर्ल्ड कपपूर्वी ही रक्कम यापेक्षा खूपच कमी होती. तिच्या लोकप्रियतेमुळे आणि मैदानावरील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे कंपन्या तिला ‘पॉझिटिव्ह आयकॉन’ म्हणून पाहू लागल्या आहेत. जेमिमाचा स्वभाव, तिची सोशल मीडिया उपस्थिती, डान्स आणि संगीतावरील आवड आणि मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने व्यक्त होणे यामुळेही ती ब्रँड्ससाठी आकर्षक चेहरा ठरत आहे.

सध्या जेमिमा BoAt, Hyundai, Red Bull, Gillette आणि Dream11 सारख्या मोठ्या कंपन्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. आता तिला लाइफस्टाइल, वेलनेस, फिटनेस आणि फायनान्स सारख्या नव्या क्षेत्रांतूनही स्पॉन्सरशिपचे प्रस्ताव मिळत आहेत. तिची सद्यस्थितीत अंदाजे नेटवर्थ 8 ते 15 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. वर्ल्ड कप विजयानंतर ही आकडेवारी आणखी वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.

भारतामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला क्रिकेटरबाबत बोलायचे झाले तर स्मृती मंधाना अव्वल आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारात स्मृती, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांचा ग्रेड A मध्ये समावेश असून, त्यांना वर्षाला 50 लाख रुपये मानधन मिळते. मात्र स्मृतीची सर्वात मोठी कमाई महिला प्रीमियर लीग (WPL) मधून होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिची 3.4 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती, जो WPL मधील सर्वात मोठा करार होता. त्यामुळे तिने कमाईच्या बाबतीत इतर महिला क्रिकेटरपेक्षा मोठी आघाडी घेतली आहे.

जेमिमाचा ब्रँड ग्राफ झपाट्याने वाढत असल्याने पुढील काही वर्षांत तीही भारतातील टॉप-इन्कमिंग खेळाडूंपैकी एक होऊ शकते. तिच्या मैदानावरील खेळासोबतच तिची बहुमुखी प्रतिमा आणि सोशल मीडिया एंगेजमेंट यामुळे ब्रँड्समध्ये तिची मागणी वाढत आहे. महिला क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि भारताच्या विजयामुळे खेळाडूंच्या आकर्षक करारांत मोठी वाढ पाहायला मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed