शिंदे गटाचा नवीन डिजिटल ॲप; बोगस मतदारांवर ठेवणार नजर, शिवसेनेची रणनीती

0
शिंदे गटाचा नवीन डिजिटल ॲप; बोगस मतदारांवर ठेवणार नजर, शिवसेनेची रणनीती

शिंदे गटाचा नवीन डिजिटल ॲप; बोगस मतदारांवर ठेवणार नजर, शिवसेनेची रणनीती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या ॲपद्वारे शिंदे गट बोगस मतदार शोधणार. बूथ स्तरावर तपासणी करून मतदार यादीतील घोळ दूर करण्याची रणनीती.

सायली मेमाणे

पुणे २१ ऑगस्ट २०२५ : मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) ने डिजिटल रणनितीचा नवा उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या एका खास ॲपच्या माध्यमातून मतदार यादीतील बोगस मतदार शोधून काढणे हा प्रमुख उद्देश आहे.

या ॲपच्या माध्यमातून मतदार यादीतील प्रत्येक मतदाराचे नाव, पत्ता आणि नोंदणी तपासली जाईल. तसेच, एकाच पत्त्यावर जास्त मतदार नोंदणी आहेत की नाही, याची तपासणीही केली जाणार आहे. अंतर्गत सूत्रांनुसार, काही ठिकाणी बोगस इमारतींचे पत्ते दाखवून बोगस मतदार तयार केले जात आहेत. या ॲपमुळे अशा बनावट मतदारांना सहज शोधून काढणे शक्य होईल, अशी अपेक्षा शिंदे गटाने व्यक्त केली आहे.

डिजिटल रणनीती आणि संघटनात्मक बांधणी:
शिंदे गटाने आपल्या पदाधिकाऱ्यांना पुढील 15 दिवसांत सक्रिय सदस्य नोंदणीसाठी निर्देश दिले आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणीवरही भर दिला जाणार आहे. यामुळे केवळ बोगस मतदार शोधणे नव्हे, तर पक्षाची संघटनात्मक ताकदही मजबूत होईल.

मोहीम रचना:
या ॲपच्या यशस्वितेसाठी मोहीम व्यवस्थापक, बूथ सर्वे प्रमुख, सहयोगी बूथ सर्वे प्रमुख, सर्वेक्षक आणि निरीक्षक अशा पाच स्तरांवर काम होणार आहे. प्रत्येक बूथवर मतदान यादीतील तपासणी करून बोगस मतदारांचा अचूक डेटा गोळा केला जाईल.

विशेषत: हा प्रयोग यशस्वी झाला, तर आगामी निवडणुकांमध्ये बोगस मतदारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची ही डिजिटल रणनीती भविष्यातील निवडणुकांच्या तयारीत एक महत्वाचा टप्पा ठरेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed