सुप्रीम कोर्टाने इन्फ्लुएन्सर्सना फटकारलं; समय रैनासह ५ जणांना माफी मागण्याचे आदेश

दिव्यांग नागरिकांचा अपमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने समय रैना, विपुन गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर, निशांत तंवर यांना फटकारले. ५ जणांना सार्वजनिक माफी मागण्याचे आदेश.
सायली मेमाणे
पुणे २५ ऑगस्ट २०२५ : नवी दिल्ली : दिव्यांग आणि गंभीर आजारांनी त्रस्त नागरिकांची खिल्ली उडवल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पाच इन्फ्लुएन्सर्सना कडक फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना सार्वजनिक माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना, विपुन गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांचा समावेश आहे. यांच्यावर दिव्यांग नागरिकांचा अपमान करणारे व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी क्युअर एसएमए फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. संस्थेने मांडलेल्या युक्तिवादात, अशा प्रकारच्या कॉमेडीमुळे पीडित नागरिकांच्या भावना दुखावतात तसेच समाजात अपंगत्व आणि आजारांविषयी चुकीची धारणा तयार होते, असे म्हटले आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि थेट पाचही जणांकडून माफी मागवून घेतली.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की, सर्व आरोपींनी आपापल्या यूट्यूब चॅनेल्स व इतर सोशल मीडिया अकाऊंट्सवर सार्वजनिक माफी मागावी. तसेच भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये याची काळजी घेण्याचेही आदेश दिले.
कोर्टात हजर असलेल्या पाचही कॉमेडीयन्सनी तात्काळ माफी मागितली. यानंतर त्यांना वारंवार कोर्टात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली.
सुनावणीदरम्यान या प्रकरणाचा संबंध “इंडियाज गॉट टॅलेंट” शोमधील वादाशी जोडण्यात आला. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर अपमानास्पद विधाने केल्याचा आरोप झाला होता. त्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांसमोर आपली चूक मान्य केली होती.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने कोर्टाला कळवले की, अशा प्रकारच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (guidelines) तयार केली जात आहेत.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter