धावत्या लोकलवर दगड फेकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश! व्हायरल व्हिडिओमुळे उघड झालं सत्य, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

0
धावत्या लोकलवर दगड फेकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश! व्हायरल व्हिडिओमुळे उघड झालं सत्य, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

धावत्या लोकलवर दगड फेकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश! व्हायरल व्हिडिओमुळे उघड झालं सत्य, प्रवाशांमध्ये संतापाची लाट


मुंबईत धावत्या लोकल ट्रेनवर साडी नेसलेल्या महिलेने दगड फेकल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.


सायली मेमाणे

पुणे १७ ऑक्टोबर २०२५ : मुंबईत पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. धावत्या लोकल ट्रेनवर साडी नेसलेल्या एका महिलेने दगड फेकल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महिला ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभी असून, समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनवर मोठा दगड फेकताना दिसते. दगड थेट त्या ट्रेनच्या इंजिनच्या काचेवर आदळतो. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड संताप उसळला असून, नागरिकांनी महिलेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांत प्रवासी गंभीर जखमीही झाले आहेत. 21 सप्टेंबर रोजी शिवडी आणि वडाला स्थानकादरम्यान अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यात 21 वर्षीय तरुणीला गंभीर दुखापत झाली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होणाऱ्या या व्हिडिओमुळे रेल्वे सुरक्षेवरील प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.

व्हिडिओमध्ये साडी नेसलेली महिला ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभी असलेली दिसते. ट्रेन ट्रॅकवर वेगाने धावत असताना ती महिला हातात घेतलेला दगड समोरून येणाऱ्या ट्रेनकडे जोरात फेकते. हा दगड थेट लोकोपायलटच्या विंडोवर जाऊन आपटतो. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा प्रसंग पाहून सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या महिलेच्या कृत्याला गुन्हा ठरवत तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सातत्याने उपाययोजना करत असले तरी अशा घटनांमुळे प्रवासी आणि लोकोपायलट यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे. व्हिडिओच्या आधारे महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे प्रवाशांनी अशा घटनांची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी सोशल मीडियावर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने म्हटले की, “हे केवळ साधं कृत्य नाही, तर हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.” अनेकांनी अशा माथेफिरू लोकांविरोधात कठोर कारवाई करून इशारा द्यावा, अशी मागणी केली आहे. सध्या या व्हिडिओमुळे रेल्वे प्रवासी सुरक्षा आणि देखरेख यावर चर्चा रंगली आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने अधिक गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed