अॅमेझॉनमध्ये रोबोट्सची भरती; सहा लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

0
अॅमेझॉनमध्ये रोबोट्सची भरती; सहा लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

अॅमेझॉनमध्ये रोबोट्सची भरती; सहा लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

अॅमेझॉनच्या योजना: २०३३ पर्यंत सहा लाख नोकऱ्यांवर रोबोट्स तैनात होणार? कंपनी आर्थिक बचतीसाठी ऑटोमेशनवर जोर देत आहे, परंतु अॅमेझॉनने नाकारले.

सायली मेमाणे

पुणे २३ ऑक्टोबर २०२५ : तंत्रज्ञान उद्योगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि रोबोटिक्सच्या जोरावर माणसांच्या कामकाजाचे स्वरूप बदलत आहे. याच साखळीत आता अॅमेझॉनचं नाव चर्चेत आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार, अॅमेझॉनने २०३३ पर्यंत अमेरिकेत सहा लाखांहून अधिक नोकऱ्यांमध्ये रोबोट्स तैनात करण्याचा प्लान तयार केला असल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. या नोकऱ्यांवर आतापर्यंत माणसे कार्यरत होती, पण या जागांवर आता रोबोट्स नियुक्त केले जाणार असल्याचे सांगितले जात होते. यामुळे येत्या काळात लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली गेली.

२०२७ पर्यंत कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होईल?
अॅमेझॉनच्या या योजनेनुसार गोदाम आणि डिजिटल प्रणालीतील माणसांवरील अवलंबित्व कमी करण्याचा हेतू आहे. AI आणि रोबोटिक्सच्या मदतीने कंपनीच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या ऑटोमेशनमुळे भविष्यात नोकऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते. अॅमेझॉनची रोबोटिक्स टीम कंपनीच्या एकूण ऑपरेशनचा सुमारे ७५% भाग ऑटोमेशनसाठी काम करत आहे. याअंतर्गत २०२७ पर्यंत १,६०,००० नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.

आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, अॅमेझॉनला या योजनेमुळे मोठी बचत होऊ शकते. गोदामातून ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहचवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर साधारण ३० सेंटची बचत करता येईल. २०२५ ते २०२७ दरम्यान या ऑटोमेशनमुळे कंपनी अंदाजे १२.६ बिलियन डॉलर (तब्बल १.०५ लाख कोटी रुपये) बचत करेल. या नव्या तंत्रज्ञानामुळे अॅमेझॉनचे कामकाज जलद, अचूक आणि किफायतशीर होईल, पण त्याचवेळी लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर असलेला धोका लक्ष वेधतो.

अॅमेझॉनची प्रतिमा पारदर्शक आणि जबाबदार कॉर्पोरेट कंपनी म्हणून ओळखली जाते. या बदलामुळे ५ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त झाली होती.

कंपनीने दिला नकार
न्यूयॉर्क टाइम्सच्या लीक झालेल्या वृत्तावर अॅमेझॉनने स्पष्ट केले की, सहा लाख नोकऱ्यांमध्ये रोबोट्स तैनात होणार नाहीत. उलट, कंपनी येत्या काळात २.५ लाख स्टाफची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे रोबोट्समुळे होणार्या नोकरी संकटाविषयीचा डर काहीसा कमी झाला आहे, तरीही ऑटोमेशन आणि AIच्या योजनेमुळे भविष्यात कामकाजातील बदल निश्चित आहेत.

एकंदर, अॅमेझॉनच्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन योजनांमुळे कंपनीस मोठी आर्थिक बचत होईल, पण या बदलामुळे नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांचा प्रश्न अजून चर्चेचा विषय राहील.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *