पुणे: कुमठेकर रोडवर ‘द्वारकादास शामकुमार’चे भव्य दालन; ७० व्या शोरूमचे थाटात उद्घाटन
पुण्यात “द्वारकादास शामकुमार”चे भव्य नवे शोरूम सुरू; कुमठेकर रोडवर आकर्षक कलेक्शन
Dwarakadas Shamkumar (DS Mill) चे कुमठेकर रोड, पुणे येथे नवे शोरूम उद्घाटन; साड्या, कुर्ती व एथनिक वेअरवर विशेष ऑफर्स २५ मार्चपर्यंत.
पुणे १८ मार्च २०२६ :पुणे: कापड व्यवसायातील पाच दशकांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ‘द्वारकादास शामकुमार’ (DS Mill) या सुप्रसिद्ध वस्त्र ब्रँडने पुणेकरांच्या सेवेत आणखी एक पाऊल टाकत, कुमठेकर रोड येथे आपल्या भव्य शोरूमचे उद्घाटन केले आहे. १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याने ब्रँडच्या विस्तार प्रवासात एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. सदाशिव पेठेतील ‘चितळे सदन’ समोर, माधवस्मृती इमारतीत तीन मजल्यांवर विस्तारलेले हे अद्ययावत दालन आता ग्राहकांसाठी सज्ज झाले आहे.

हे शोरूम पुण्यातील १४ वे, तर संपूर्ण भारतातील ७० वे दालन ठरले असून, ब्रँडने विस्ताराचा ‘सत्तरी’चा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. १९७६ मध्ये एका छोट्या दुकानापासून सुरू झालेल्या या प्रवासाने आज देशव्यापी ओळख निर्माण केली आहे. संस्थापक श्री. द्वारकादास हस्तीमल माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापकीय संचालक श्री. श्यामकुमार माहेश्वरी, श्री. शिवेक माहेश्वरी आणि श्री. सेहुल माहेश्वरी यांच्या नेतृत्वात हा समूह सातत्याने प्रगती करत आहे.

या नवीन शोरूममध्ये ग्राहकांना एकाच छताखाली फॅक्टरी-टू-कस्टमर मॉडेलद्वारे परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाचे कापड उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथे बनारसी, सिल्क, डिझायनर साड्यांचा अफाट संग्रह, तसेच कुर्ती, ड्रेस मटेरियल आणि पुरुषांसाठी प्रीमियम शर्टिंग-सुटिंगची आकर्षक रेंज उपलब्ध आहे. “ग्राहकांचा विश्वास आणि गुणवत्तेची बांधिलकी हीच आमची ताकद असून, या माध्यमातून आम्ही खरेदीचा एक सुखद अनुभव देण्यास कटिबद्ध आहोत,” असे मत संचालक श्री. शिवेक माहेश्वरी यांनी यावेळी व्यक्त केले.
नवीन शोरूमच्या निमित्ताने ग्राहकांसाठी १७ मार्च ते २५ मार्च या कालावधीत विशेष उद्घाटन सवलती आणि आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी गुढीपाडवा आणि लग्नसराईची गरज ओळखून खास कलेक्शन येथे सादर करण्यात आले आहे. सर्व पुणेकर ग्राहकांनी या दालनाला भेट देऊन दर्जेदार वस्त्रखरेदीचा आणि आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रँडतर्फे करण्यात आले आहे
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information