मालाडमध्ये ‘रिधमबाबा’चा भोंदूपणा उघड उपचारांच्या नावाखाली कोंबडी, बकऱ्याचं काळीज, दारूची मागणी

0
मालाडमध्ये ‘रिधमबाबा’चा भोंदूपणा उघड उपचारांच्या नावाखाली कोंबडी, बकऱ्याचं काळीज, दारूची मागणी

मालाडमध्ये ‘रिधमबाबा’चा भोंदूपणा उघड उपचारांच्या नावाखाली कोंबडी, बकऱ्याचं काळीज, दारूची मागणी

मालाडमध्ये देवी अवतरण्याचा दावा, भूतबाधा उतरवण्याचे नाटक; ६० हून अधिक तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांची कारवाई

पुणे १६ एप्रिल २०२६ : मुंबईतील मालाड परिसरात स्वतःला ‘देवी येते’ असा दावा करणाऱ्या एका भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘रिधमबाबा’ म्हणून ओळखला जाणारा हा इसम उपचारांच्या नावाखाली भक्तांकडून कोंबडी, बकऱ्याचं काळीज, दारू आणि सिगारेटची मागणी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल करून संबंधिताला अटक केली आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रिधम पांचाल उर्फ मॉन्टी पांचाल (वय ३७) हा गुरुवार आणि शनिवार रात्री मालाडमधील एका मैदानावर ‘दरबार’ भरवत असे. रात्री ८ ते पहाटे ७ या वेळेत तो लोकांवर उपचार करण्याचे नाटक करत असे. आपल्या अंगात देवी अवतरते आणि आपण भूतबाधा उतरवतो, असा दावा तो करत होता. विविध आजार बरे करणे, समस्या दूर करणे, तसेच अपत्यप्राप्तीसाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तो लोकांना आकर्षित करत असल्याचे तक्रारींत नमूद आहे.

उपचारादरम्यान तोंडात पेटती सिगारेट ठेवून ‘भूतबाधा’ काढण्याचे नाट्य तो सादर करत असे, असा आरोप आहे. या ‘पूजा-उपचारां’साठी तो भक्तांकडून रोख पैशांसोबतच कोंबडी, बकऱ्याचे काळीज, दारू आणि सिगारेट मागत असे. दूरदूरहून लोक समस्या घेऊन येत असल्याने परिसरात मोठी गर्दी होत होती. या प्रकरणाचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यानंतर पोलिसांनी कारवाई गतीमान केली.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, उपचारांच्या नावाखाली महिलांना आणि मुलींना मध्यरात्री बोलावले जात होते. चार वर्षांपूर्वी जिम ट्रेनर असलेला हा इसम नंतर भविष्य सांगण्याच्या नावाखाली अशा प्रकारचे ‘दरबार’ भरवू लागला. सध्या ६० हून अधिक नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तक्रार करणाऱ्यांना धमकावण्याचाही प्रयत्न झाल्याचे आरोप समोर आले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासादरम्यान आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *