Heart Attack Symptoms in Women: महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी, वेळेवर ओळखणं का महत्त्वाचं?

0
महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी असतात का?

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी असतात का?

हार्ट अटॅकची लक्षणं महिलांमध्ये पुरुषांपेक्षा वेगळी असतात – कंबर, जबडा दुखणे, थकवा, श्वास लागणे यासारख्या सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढू शकतो. वेळीच काळजी घ्या.

सायली मेमाणे

पुणे ७ जुलै २०२५ : महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी असतात का? जाणून घ्या कारण आणि उपाय

भारतातील महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या एका अहवालानुसार, 3 ते 13 टक्के भारतीय महिला कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) ने ग्रस्त आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांत हृदयरोगाचे प्रमाण तब्बल 300% ने वाढले आहे. या परिस्थितीचा सर्वात मोठा धोका म्हणजे महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं सौम्य आणि वेगळी असल्याने त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते.

महिलांमध्ये हार्ट अटॅक कधी होतो?

संशोधनानुसार, भारतीय महिलांना हार्ट अटॅक सरासरी वय 59 व्या वर्षी येतो, जे पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. हे वय विकसनशील देशांच्या तुलनेतही कमी मानले जाते. याचा अर्थ महिलांनी त्यांच्या हृदयाच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची सामान्य आणि सौम्य लक्षणं:

  • कंबर, जबडा किंवा पोटात वेदना
  • सतत थकवा आणि अशक्तपणा
  • मळमळ, चक्कर येणे किंवा श्वास लागणे
  • छातीत अस्वस्थता (pain नाही, discomfort असतो)
  • अपचन किंवा आम्लता वाटणे
  • झोपेची समस्या किंवा ताण वाढणे

ही लक्षणं अनेकदा स्ट्रेस, आम्लता किंवा घरगुती जबाबदाऱ्या म्हणून दुर्लक्षित केली जातात. परिणामी योग्य निदान आणि उपचार वेळेवर होत नाहीत.

महिलांमध्ये हृदयविकार का दुर्लक्षित केला जातो?

महिलांची प्राथमिकता अनेकदा स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंब असते. मानसिक आरोग्य, दीर्घकालीन ताण, झोपेचा अभाव, वयपरत्वे होणारे हार्मोनल बदल, पीसीओएस, गर्भधारणेदरम्यानचा मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे महिलांना हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

या लक्षणांकडे दुर्लक्ष नका करू:

  • दैनंदिन काम करताना दम लागणे
  • छातीत चिरडल्यासारखं वाटणे
  • रात्री झोपेत अडथळा
  • कोणतीही शारीरिक हालचाल करताना श्वासाचा त्रास
  • वारंवार चक्कर येणे किंवा थकवा वाटणे

ही लक्षणं तुमच्या शरीराचं अलार्म सिस्टम आहेत. विशेषतः ज्या महिलांना कौटुंबिक इतिहास आहे, त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

काय करावं?

  • ४० वयापर्यंत नियमित हृदय तपासणी करणे
  • स्ट्रेस मॅनेजमेंट (योगा, मेडिटेशन)
  • अन्नात फॅट आणि मीठाचे प्रमाण कमी करणे
  • नियमित व्यायाम
  • लवकर निदानासाठी ECG/Echo/Stress Test करणे
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या

निष्कर्ष:

महिलांमध्ये हार्ट अटॅक ही गंभीर आणि दुर्लक्षित बाब आहे. याची लक्षणं सौम्य असली तरी याकडे दुर्लक्ष केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. वेळेवर निदान, जागरूकता आणि काळजी हीच बचावाची गुरुकिल्ली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed