रिपोर्टर झोहेब शेख
पुणे – विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी फिरोज कुतुब खान (वय २६, रा. एसआरए झोपडपट्टी, राजीवनगर, विमाननगर, पुणे) याला पोलीसांनी अटक केली आहे.
गु.र.नं. ४८१/२०२४ अंतर्गत भारतीय दंड विधान व हत्यार कायद्यांतर्गत तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर फिरोज खान हा पसार झाला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
मा. सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी हे आरोपीच्या शोधात होते.
गोपनीय माहितीवरून सापळा यशस्वी
पोलीस अंमलदार “नाईक आणि पिसाळ” यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी एसआरए बिल्डिंग, विमाननगर येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून संध्याकाळच्या सुमारास फिरोज खान याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याला मा. सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्यासमोर हजर करण्यात आले.
या कारवाईत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, गुन्हे विभागाच्या आशालता खापरे, तसेच सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन व पोलीस रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे आणि लालु क-हे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.