रिपोर्टर : झोहेब शेख
दिनांक: ०१ मे २०२५
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे शहरात अमली पदार्थ पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत तब्बल ६४ किलो गांजा जप्त करून दोन वेगवेगळ्या टोळीतील चार सदस्यांना अटक केली आहे.
पुणे शहर पोलीसच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (गुन्हे शाखा) ने गेल्या आठवड्यात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये ओडिशा आणि धुळे येथून पुरवले जाणारे एकूण ६४ किलो गांजा (बाजारभाव सुमारे १३.२८ लाख रुपये) जप्त केला आहे. या कारवाईत दोन वेगवेगळ्या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पहिली कारवाई : पुणे रेल्वे स्टेशनजवळ ३० किलो गांजा जप्त
तारीख: ०१/०५/२०२५
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पो.नि. सुदर्शन गायकवाड आणि सहाय्यक पो.नि. नितीनकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुणे रेल्वे स्टेशनजवळ पेट्रोलिंग दरम्यान दोन संशयितांना अटक करण्यात आली:
पप्पू चक्रधर देवरी (वय ३२, गाव: कलंड, जसपुर, ओडिशा)
चंदन सुभाष कुंवर (वय १९, गाव: जगतपुर, कटक, ओडिशा)
त्यांच्याकडून ३० किलो गांजा (बाजारभाव: ६.२४ लाख रुपये) तसेच इतर पुरावे जप्त केले. त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्र. १४५/२०२५ दाखल करण्यात आला आहे. भारतीय नारकोटिक पदार्थ आणि मानसोपचार औषध अधिनियम (NDPS Act) अंतर्गत खालील कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे:
कलम ८(क) (विक्री/वितरण)
कलम २०(ब)(ii)(क) (व्यापारी प्रमाणात ताबा)
कलम २९ (साजिश)
दुसरी कारवाई: खडकीमध्ये ३४ किलो गांजा सापडला
तारीख: २२/०४/२०२५
खडकी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान नॅशनल रूट्स अँड ट्रॅव्हल्स, वाकडेवाडी येथे दोन संशयितांना अटक करण्यात आली:
राकेश रूपसिंग पावरा (वय २५, गाव: शिरपुर, धुळे)
एक अल्पवयीन (१७ वर्षीय) (धुळे)
त्यांच्याकडून ३४ किलो गांजा (बाजारभाव: ७.०४ लाख रुपये) जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध खडकी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्र. ११५/२०२५ दाखल करण्यात आला आहे. त्यांना NDPS Act च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क), आणि २९ अंतर्गत आरोपी ठरविण्यात आले आहे.
मार्गदर्शक अधिकारी
या यशस्वी कारवाईला पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले:
मा. श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)
मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे)
मा. श्री. राजेंद्र मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २)
कारवाई करणाऱ्या टीममध्ये:
पो.नि. सुदर्शन गायकवाड
सहा. पो.नि. नितीनकुमार नाईक
पो.अं. नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, सय्यद साहिल शेख, उदय राक्षे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, निलम पाटील
या कारवाईमुळे पुणे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलाच्या सततच्या प्रयत्नांमुळे अशा गुन्हेगारांना न्यायालयासमोर आणण्यात नक्कीच यश मिळत आहे.