• Thu. Jul 24th, 2025

NewsDotz

मराठी

कोंढवा येथे हातभट्टी दारूचा साठा जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

May 2, 2025

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे | कोंढवा – कोंढवा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत हातभट्टी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपी फरार आहे.

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 1 मे 2025 रोजी संध्याकाळी 6.15 वाजता गोकुळनगर लेन नंबर 04, शिवकृपा मेडिकलजवळील ओम बंगल्या शेजारील पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. यावेळी अरुण हनुमंत ढवळे (वय 46, रा. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) व नेहाल उर्फ सोन्या कुंभार हे व्यक्ती बेकायदेशीररित्या, विनापरवाना ३४,०००/- रुपये किमतीची हातभट्टी दारू विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
८ हत्ती कॅन्स (प्रत्येकी ३५ लिटर) – एकूण २८० लिटर तयार हातभट्टीची दारू, किंमत अंदाजे २८,०००/- रुपये

३०० प्लास्टिकच्या पिशव्या (प्रत्येकी २०० मिली) – कापडी पिशवीत पॅक केलेल्या, किंमत अंदाजे ६,०००/- रुपये

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: रु. ३४,०००/-

याप्रकरणी गुन्हा क्रमांक 355/2025, मुंबई प्रोहिबिशन अ‍ॅक्ट कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई अभिजीत सोपान जाधव (शिपाई क्र. 8201) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.

कारवाईस उपस्थित अधिकारी: श्री. राजकुमार शिंदे पोलीस उपयुक्त परिमंडल ५
श्री. विनय पाटणकर – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन
श्री. अब्दुल शेख – पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस स्टेशन
श्री. मयुर वैरागकर – सहायक पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे परिमंडळ ५ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली व गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर हे करत आहेत. यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.