व्हिएतनाममध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय आयुर्हेल्थ समिट आणि एक्स्पो २०२५: आयुर्वेद आणि योगासाठी जागतिक व्यासपीठ

0
व्हिएतनाममध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय आयुर्हेल्थ समिट आणि एक्स्पो २०२५: आयुर्वेद आणि योगासाठी जागतिक व्यासपीठ

व्हिएतनाममध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय आयुर्हेल्थ समिट आणि एक्स्पो २०२५: आयुर्वेद आणि योगासाठी जागतिक व्यासपीठ

दुसरा आंतरराष्ट्रीय आयुर्हेल्थ समिट आणि हेल्थ एक्स्पो २०२५ हा १ ते २ नोव्हेंबरला व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी येथे होणार आहे. एमयूएचएस आणि आयुष विभागाच्या पाठबळाने होणारा हा समिट विद्यार्थी, संशोधक, डॉक्टर आणि उद्योगातील तज्ज्ञांसाठी जागतिक व्यासपीठ ठरेल.

पुणे २६ ऑगस्ट २०२५ : भारतीय परंपरेतील आरोग्यव्यवस्था आयुर्वेद आणि योग यांची जागतिक स्तरावरची लोकप्रियता आज प्रचंड वेगाने वाढत आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलित विकास साधणाऱ्या या पद्धती मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि ताण यांसारख्या जीवनशैलीजन्य विकारांवर नैसर्गिक व प्रभावी उपाय सुचवतात. त्यामुळे आयुर्वेद आणि योग या केवळ वैद्यकीय प्रणाली राहिलेल्या नसून आता त्यांना जगभरात संपूर्ण आरोग्यदायी जीवनशैलीचा शास्त्र म्हणून मान्यता मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दुसरा आंतरराष्ट्रीय आयुर्हेल्थ समिट आणि हेल्थ एक्स्पो हा १ आणि २ नोव्हेंबर २०२५ रोजी व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी येथे आयोजित केला जात आहे.

व्हिएतनाममध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय आयुर्हेल्थ समिट आणि एक्स्पो २०२५
व्हिएतनाममध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय आयुर्हेल्थ समिट आणि एक्स्पो २०२५

हा जागतिक कार्यक्रम सिफा (SIFA) या आयुर्वेद आणि योग प्रसारासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने, स्वान फाउंडेशन आणि शिव आयुर्वेद, सिंगापूर यांच्या सहयोगाने आयोजित होत आहे. यास आयुष विभाग, भारत सरकार आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), नाशिक यांचे अधिकृत पाठबळ मिळाले आहे. आयोजकांच्या माहितीनुसार या समिटमध्ये विद्यार्थी, संशोधक, डॉक्टर, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील नेते आणि पारंपरिक वैद्यकशास्त्राचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे आयुर्वेद, योग आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर सहकार्य, संशोधन आणि ज्ञानविनिमयासाठी व्यासपीठ निर्माण करणे आहे.

डॉ. शिल्पा स्वर (केसरीकर), संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सिफा आणि शिव आयुर्वेद (सिंगापूर), यांनी सांगितले की, या परिषदेमागील मुख्य हेतू म्हणजे आयुर्वेद व योग यांचा जागतिक स्तरावर प्रसार करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधी निर्माण करणे. २०२३ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या पहिल्या परिषदेत आठ देशांतील १०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. त्या यशस्वी अनुभवाच्या आधारे यंदा व्हिएतनामला यजमान देश म्हणून निवडण्यात आले आहे, कारण आग्नेय आशिया हा प्रदेश आयुर्वेद आणि योगासाठी झपाट्याने उदयाला येत आहे. या माध्यमातून भारतीय तज्ज्ञ, उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होणार आहेत.

या परिषदेला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यात डॉ. तनुजा नेसरी, संयुक्त संचालक, इंस्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद, जामनगर; डॉ. मिलिंद निकुंभ, प्र-उपकुलगुरू, एमयूएचएस नाशिक; डॉ. नारायण जाधव, अध्यक्ष, मेडिकल अससेसमेंट आणि रेटिंग बोर्ड, एनसीआयएसएम, नवी दिल्ली यांचा समावेश आहे. तसेच डॉ. विप्रा पांडे, भारताचे व्हिएतनाममधील वाणिज्यदूत, आणि जिनिव्हाहून मि. रिचन चॅपल यांचाही समावेश असेल.

या समिटमधील महत्त्वाच्या आकर्षणांमध्ये आठपेक्षा जास्त देशांतील प्रतिनिधींचा सहभाग, आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा, विद्यार्थी व संशोधकांसाठी शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तक प्रकाशनाच्या संधींचा समावेश आहे. याशिवाय आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, उपकरणे, तंत्रज्ञान आणि नवनवीन शोधांचे प्रदर्शन आयोजित केले जाईल. आयुर्वेद व योग क्षेत्रातील वाढत्या जागतिक व्यावसायिक संधींवर विशेष सत्रे, उत्कृष्ट योगदानासाठी सिफा पुरस्कार, आणि धोरणे, शिक्षण व उद्योगाच्या भविष्यकाळावर पॅनेल चर्चाही होणार आहे.

शशिकांत कांबळे, अध्यक्ष, स्वान फाउंडेशन यांनी सांगितले की हा समिट आयुर्वेदाचे जागतिकीकरण करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. व्हिएतनाम आणि इतर आग्नेय आशियाई देश आरोग्य व वेलनेस क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे भारतीय तज्ज्ञांना अभूतपूर्व सहकार्य व संधी उपलब्ध होणार आहेत. जागतिक स्तरावर वेलनेस व योग केंद्रांची मागणी वाढत असून त्यामुळे या क्षेत्रात अमर्याद वाढीच्या संधी उपलब्ध आहेत.

दुसरा आंतरराष्ट्रीय आयुर्हेल्थ समिट आणि एक्स्पो २०२५ हा भारताच्या सर्वांगीण आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाला अधिक बळकट करणारा ऐतिहासिक कार्यक्रम ठरेल. या माध्यमातून नवी सहकार्ये, संशोधनाच्या संधी आणि आयुर्वेद व योगासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त होईल.

नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
+91 98903 86924, +91 94210 66369
www.sifaved.com

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed