गुन्हे शाखा युनिट ४ ची मोठी कामगिरी — घरफोडीचा आरोपी मुद्देमालासह अटकेत

0
गुन्हे शाखा युनिट ४ ची मोठी कामगिरी — घरफोडीचा आरोपी मुद्देमालासह अटकेत

गुन्हे शाखा युनिट ४ ची मोठी कामगिरी — घरफोडीचा आरोपी मुद्देमालासह अटकेत

पुण्यात गुन्हे शाखा युनिट ४ ने घरफोडीचा आरोपी विशाल संपत चंदनशिवे याला सोन्याचे दागिने हस्तगत करत अटक केली. आरोपीवर आधीही चोरीसह इतर गुन्हे आहेत, पोलिस तपास सुरू.

रिपोर्टर: झोहेब शेख

पुणे २५ सप्टेंबर २०२५ : पुणे – घरफोडी व चोरीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांना सतत त्रास देत असलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने दक्षतेपूर्वक अटक केली. आरोपीकडून जवळपास २,९८,४८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्याच्यावर आधीच दोन घरफोडीचे गुन्हे नोंदले आहेत.

मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री. निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम, पो. ह. अमजद शेख आणि तुषार खराडे पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक व्यक्ती येरवड्यातून खडकीकडे चोरीचे सोने विक्रीसाठी नेणार आहे. या माहितीच्या आधारे होळकर ब्रिजजवळ सापळा रचण्यात आला.

या सापळ्यात २२ वर्षीय विशाल संपत चंदनशिवे (रा. तुकारामनगर, चंदननगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या अंगझडतीतून सोन्याचे दागिने जप्त झाले. चौकशीत त्याने ही चोरी खराडी येथील बंद घरातून केली असल्याचे मान्य केले. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गु. र. नं. १९७/२०२५ व २००/२०२५ नोंदवण्यात आले आहेत.

विशाल याच्यावर पूर्वीही वाहन चोरी, मोबाईल चोरी, जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत आणि तो जामीनावर सुटलेला वरीष्ठ रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी त्याला खराडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई मा. श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. श्री. विवेक मिसाळ, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, मा. श्री. राजेंद्र मुळीक, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२), पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहा. पोलीस फौजदार एकनाथ जोशी, पोलीस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, किशोर दुशिंग, विनोद महाजन, नागेशसिंग कुंवर, देवीदास वांढरे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे आणि शरद झांजरे यांनी मिळून केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed