रांजणगाव MIDC: 28 कि.ग्रॅ. वजनाचा 7 लाखांचा गांजा जप्त; महिला व दोन आरोपींना अटक

रांजणगाव MIDC: 28 कि.ग्रॅ. वजनाचा 7 लाखांचा गांजा जप्त; महिला व दोन आरोपींना अटक
रांजणगाव MIDC पोलीसांनी 28 कि.ग्रॅ. वजनाचा 7 लाखांचा गांजा जप्त केला. महिला दिव्या गिरे व दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
सायली मेमाणे
पुणे २७ सप्टेंबर २०२५ : पुणे, रांजणगाव: रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याने अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत 28 कि.ग्रॅ. वजनाचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत महिला दिव्या गिरे व तिचा नवरा अतुल गिरे यासह दुसरा आरोपी सुरज शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांज्याची बाजारमूल्य अंदाजे 7 लाख रुपये आहे.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले की, MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील विविध मोहिमांमध्ये शाळा, कॉलेज, कामगार वसाहतीतील लोक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, पोलीस पाटील यांचा सहभाग घेत अंमली पदार्थांच्या सेवनापासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जात आहेत. तसेच, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध ठोस पावले उचलून प्रभावी कारवाईची मोहीम राबवली जात आहे.
सृष्टी सोसायटी, बाभुळसर खुर्द येथील रो-हाऊसमध्ये आरोपी दिव्या गिरे व अतुल गिरे यांनी गांजा विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलीसांनी तत्काळ दोन पथकांसह दुपारी 12:30 वाजता छापा टाकला.
सदर छाप्यामध्ये सौ. दिव्या अतुल गिरे (वय 27), सुरज दिलीप शिंदे (वय 28) यांच्याकडून 28 कि.ग्रॅ. वजनाचा गांजा जप्त झाला. अधिक तपासात निष्पन्न झाले की, महिला दिव्या गिरे यांचा नवरा अतुल वसंत गिरे यांनी हा गांजा विक्रीसाठी आणला होता.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला असून, आरोपींना 26 सप्टेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिरुर यांनी आरोपींना 29 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
जप्त केलेला गांजा आणि आरोपींच्या जबाबांच्या आधारे, पोलीस पुढील तपास सुरू करत आहेत. त्यात गांजा कोणाकडून विक्रीसाठी आणला होता आणि कोणाला विकला जाणार होता, याचा शोध घेतला जात आहे.
सदर कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पो.हवा. विजय सरजिने, पो.हवा. विलास आंबेकर, पो.कॉ. गणेश वाघ, पो.कॉ. उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड, म.पो. हवा. विद्या बनकर, पो.हवा. माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, पो.कॉ. रामेश्वर आव्हाड, पो.हवा. हेमंत इनामे यांनी सहभाग घेतला.
सदर कारवाई रांजणगाव MIDC पोलीस आणि शिरुर विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter