AC Local: प्रजासत्ताक दिनी मुंबईकरांना मोठी भेट, पश्चिम रेल्वेवर 12 नवीन एसी लोकल सुरू

AC Local: प्रजासत्ताक दिनी मुंबईकरांना मोठी भेट, पश्चिम रेल्वेवर 12 नवीन एसी लोकल सुरू
26 जानेवारी 2026 पासून पश्चिम रेल्वेवर 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. विरार, बोरिवली, भाईंदर, गोरेगाव मार्गावरील संपूर्ण वेळापत्रक वाचा.
पुणे 22 जानेवारी २०२६ : मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल प्रवासात आता अधिक आराम आणि थंडावा मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पश्चिम रेल्वेने मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली असून 26 जानेवारी 2026 पासून तब्बल 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती संख्या, गर्दी आणि उन्हाळ्यातील वाढता उकाडा लक्षात घेता एसी लोकलची मागणी सातत्याने वाढत आहे. हीच गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने ही महत्त्वाची पायरी उचलली आहे.
पश्चिम रेल्वेवर सुरू होणाऱ्या या 12 एसी लोकल फेऱ्यांमध्ये अप दिशेला सहा आणि डाऊन दिशेला सहा गाड्यांचा समावेश आहे. विरार, बोरिवली, भाईंदर आणि गोरेगाव या प्रमुख मार्गांवर या गाड्या धावणार असून फास्ट आणि स्लो अशा दोन्ही प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नोकरदारांसह नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अप मार्गावर म्हणजेच चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या एसी लोकलमध्ये पहाटे 5.14 वाजता गोरेगावहून सुटणारी स्लो लोकल सकाळी 6.11 वाजता चर्चगेटला पोहोचेल. सकाळी 7.25 वाजता बोरिवलीहून सुटणारी फास्ट लोकल 8.20 वाजता चर्चगेटला पोहोचणार आहे. त्यानंतर 10.08 वाजता विरारहून निघणारी फास्ट लोकल 11.27 वाजता चर्चगेटला येईल. दुपारी 12.44 वाजता भाईंदरहून सुटणारी फास्ट लोकल 13.48 वाजता चर्चगेटला पोहोचेल. दुपारी 15.45 वाजता विरारहून सुटणारी स्लो लोकल सायंकाळी 17.09 वाजता चर्चगेटला येईल, तर सायंकाळी 19.06 वाजता गोरेगावहून सुटणारी स्लो लोकल रात्री 20.01 वाजता चर्चगेटला पोहोचेल.
डाऊन मार्गावर म्हणजेच चर्चगेटहून उपनगरांकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये सकाळी 6.14 वाजता चर्चगेटहून सुटणारी स्लो लोकल 7.19 वाजता बोरिवलीला पोहोचेल. सकाळी 8.27 वाजता सुटणारी फास्ट लोकल 9.51 वाजता विरारला पोहोचणार आहे. 11.30 वाजता सुटणारी फास्ट लोकल दुपारी 12.31 वाजता भाईंदरला पोहोचेल. दुपारी 13.52 वाजता चर्चगेटहून सुटणारी स्लो लोकल 15.36 वाजता विरारला येईल. सायंकाळी 17.57 वाजता सुटणारी स्लो लोकल 18.51 वाजता गोरेगावला पोहोचेल, तर रात्री 20.07 वाजता सुटणारी स्लो लोकल 21.02 वाजता गोरेगावला येईल.
एसी लोकलमुळे प्रवाशांना गर्दीतही आरामदायी, सुरक्षित आणि तुलनेने शांत प्रवासाचा अनुभव मिळत आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस एसी लोकलचा वापर वाढत असून नवीन फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare