Akola News: 30 वर्षीय तरुणाच्या गुदद्वारात अडकला 2 फूट प्लास्टिक पाईप; शस्त्रक्रियेने बाहेर काढले
30 वर्षीय तरुणाच्या गुदद्वारात अडकला 2 फूट प्लास्टिक पाईप; शस्त्रक्रियेने बाहेर काढले
अकोल्यात 30 वर्षीय तरुणाच्या गुदद्वारात 2 फूट लांबीचा प्लास्टिक पाईप अडकला. डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेने पाईप सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. सोशल मीडियावर ही घटना जोरदार चर्चेत आहे.
सायली मेमाणे
पुणे २८ ऑगस्ट २०२५ : अकोला: अकोला जिल्ह्यातील एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 30 वर्षीय तरुणाच्या गुदद्वारात सुमारे 30 सेंटीमीटर (अंदाजे 11.81 इंच) लांबीचा प्लास्टिक पाईप अडकला होता. या घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक तात्काळ त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
घटनेनुसार, हा तरुण आपल्या घरी असताना अचानक पलंगावरून पडला आणि घरात पडलेला प्लास्टिक पाईप त्याच्या गुदद्वारात अडकला. घटनेनंतर तरुणाला तीव्र वेदना सुरू होत्या आणि तो शौचास जाण्यासही असमर्थ होता. या कारणास्तव, कुटुंबीयांनी त्याला 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि एक्स-रेसह इतर चाचण्या करून पाईप गुदद्वारात खोलवर अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. घटनेतील गुंतागुंत लक्षात घेता, डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर रवी खंडारे आणि अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया रात्री सुमारे 10 वाजता पार पडली. यामध्ये सुमारे 30 सेंटीमीटर लांबीचा प्लास्टिक पाईप सुरक्षितपणे काढण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर तरुणाच्या गुदद्वारावर मोठी जखम झाली असून त्यावर योग्य ती उपचार सुरु आहेत. तरुणाची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांकडून आवश्यक काळजी घेण्यात येत असून संक्रमण किंवा इतर गुंतागुंत होऊ नये यासाठी सतर्कता ठेवण्यात आली आहे. स्थानिक डॉक्टरांनी देखील ही घटना गंभीरतेने घेतली असून अशा प्रकारच्या अपघातांपासून इतरांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी हे धक्कादायक म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी अशा प्रकारच्या अपघातांमागील संभाव्य कारणांवर चर्चा केली आहे. ही घटना केवळ अकोलाच नव्हे तर इतरांसाठीही जागरूकता निर्माण करणारी आहे.