Delhi-Mumbai Expressway Accident: एक डुलकी अन् बस खड्ड्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 40 भाविक जखमी

0
Delhi-Mumbai Expressway Accident: एक डुलकी अन् बस खड्ड्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 40 भाविक जखमी

Delhi-Mumbai Expressway Accident: एक डुलकी अन् बस खड्ड्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 40 भाविक जखमी

राजस्थानच्या अलवरमध्ये दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण बस अपघात. चालकाला डुलकी लागल्याने स्लीपर कोच बस उलटून खड्ड्यात कोसळली. 40 प्रवासी जखमी असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.

पुणे २३ मे २०२६ : राजस्थानातील अलवर जिल्ह्यात शनिवारी सकाळी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण रस्ता अपघात घडला. भरधाव वेगातील स्लीपर कोच बस नियंत्रण सुटल्याने आधी उलटली आणि नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात बसमधील सर्व 40 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ आणि किंकाळ्या सुरू झाल्या होत्या.

हा अपघात अलवर जिल्ह्यातील रैणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, बस मध्य प्रदेशातील श्योपूर येथून उत्तर प्रदेशातील गोवर्धन येथे जात होती. अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या ‘ब्रिज 84 कोस परिक्रमा’मध्ये सहभागी होण्यासाठी आणि धार्मिक कार्यक्रम तसेच श्रीमद्भागवत कथा ऐकण्यासाठी बसमधील बहुतांश भाविक प्रवास करत होते.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चालकाला वाहन चालवताना डुलकी लागली होती. त्यातच बस चुकीच्या लेनमध्ये गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट एक्सप्रेसवेवरून खाली कोसळली. बसचा वेग जास्त असल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याचे सांगितले जात आहे. या भीषण दुर्घटनेत अनेक प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रैणी पोलीस ठाण्याचे प्रभारी बनेसिंह मीणा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक आणि NHAI चे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. जखमी प्रवाशांना NHAI च्या रुग्णवाहिकांच्या मदतीने तातडीने पिनान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सहा जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अलवर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, सर्व जखमींना रुग्णालयात हलवल्यानंतर NHAI च्या पथकाने जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने खड्ड्यात पडलेली बस बाहेर काढली. अपघातानंतर काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पोलीस आता अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले आहेत. वेग, निष्काळजीपणा आणि चालकांचा थकवा हे अपघातामागील प्रमुख कारण मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच या एक्सप्रेसवेवर सीएनजी कारला आग लागून सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed