EMI थकल्यामुळे पत्नीला जबरदस्तीने नेले! झाशीतील खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा धक्कादायक प्रकार

EMI थकल्यामुळे पत्नीला जबरदस्तीने नेले! झाशीतील खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा धक्कादायक प्रकार
उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये EMI थकल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला जबरदस्तीने बँकेत डांबले. पतीच्या पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर ती मुक्त झाली. वाचा सविस्तर.
सायली मेमाणे
पुणे १ ऑगस्ट २०२५ : उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात कर्जाच्या हप्त्यामुळे घडलेली एक संतापजनक घटना समोर आली आहे. EMI न भरल्याच्या कारणावरून एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पूजा वर्मा नावाच्या महिलेला बँकेत नेऊन जबरदस्तीने डांबून ठेवलं.
पूजा वर्मा यांचे पती रविंद्र वर्मा यांनी पोलीस हेल्पलाइन 112 वर संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यावर बँक कर्मचाऱ्यांनी पूजा वर्मा यांना सोडले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार सादर केली असून 40,000 रुपयांच्या वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 11 हप्ते भरले असून बँकेच्या नोंदीत फक्त 8 दाखवले गेले. त्यामुळे त्यांनी 3 हप्त्यांचे पैसे बँकेतील कर्मचाऱ्यांनी स्वतःकडे ठेवल्याचा आरोप केला. बँकेच्या व्यवस्थापकाने मात्र हे आरोप फेटाळले असून पूजा वर्मा स्वतःहून बँकेत आल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे खासगी बँकांची वसुली पद्धत, ग्राहकांवरील दबाव आणि कायद्याच्या मर्यादा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वित्तीय संस्थांच्या वागणुकीबाबत पारदर्शकतेची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter