IRCTC Update 2025: रेल्वे वेटिंग तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा मिळणार? जाणून घ्या नवा प्रस्ताव

0
IRCTC Update 2025: रेल्वे वेटिंग तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा मिळणार?

IRCTC Update 2025: रेल्वे वेटिंग तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा मिळणार?

भारतीय रेल्वेकडून वेटिंग तिकिटांवरील क्लर्केज शुल्क रद्द करण्याचा विचार; प्रवाशांना होणार दिलासा. नवीन निर्णयामुळे पूर्ण परतावा मिळण्याची शक्यता.

सायली मेमाणे

पुणे १ जुलै २०२५ : भारतीय रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या IRCTC पोर्टलवरुन तिकीट बुक केल्यावर जर ते वेटिंग लिस्टवर असेल, तर यात्रा दिवसापूर्वी ते ऑटोमेटिक रद्द होते. त्यानंतर क्लर्क चार्जसह काही रक्कम कपात केली जाते आणि उर्वरित पैसे परत मिळतात. मात्र, आता हा नियम बदलण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करत आहे आणि त्यामुळे वेटिंग तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना पूर्ण रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.

सध्या IRCTC नुसार, वेटिंग लिस्टवरील तिकीट रद्द झाल्यास प्रति प्रवासी सुमारे 30 ते 60 रुपये शुल्क कपात केलं जातं. उदाहरणार्थ, स्लीपर क्लाससाठी हे शुल्क 60 रुपये असतं, तर एसी किंवा उच्च दर्जाच्या डब्यांसाठी यापेक्षा जास्त शुल्क आकारलं जातं. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर या शुल्काविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती आणि यावरून अनेक तक्रारी IRCTC व रेल्वे विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.

ही तक्रार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने, आता रेल्वे मंत्रालयाने या चार्जला हटवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या तो प्रस्ताव मंत्रालयात विचाराधीन आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर वेटिंग लिस्टवरील तिकिटांसाठी क्लर्केज शुल्क रद्द करण्यात येईल आणि प्रवाशांना कोणतीही कपात न करता पूर्ण परतावा मिळेल.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने विविध सुधारणा करत आहे. यामध्ये IRCTC पोर्टलवरील वापरकर्ता अनुभव सुधारणा, UPI व डिजिटल पेमेंट्ससाठी सुलभ पर्याय, तसेच आरक्षणासंबंधी सुलभ नियमांचा समावेश होतो. त्यामुळे वेटिंग तिकिटांवरील चार्ज रद्द झाल्यास लाखो प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळेल, हे निश्चित.

ही घोषणा होण्याची प्रतिक्षा अनेक प्रवासी करत असून, हा निर्णय मंजूर झाल्यास IRCTC द्वारे रेल्वे प्रवासासाठी ऑनलाईन आरक्षण करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed