• Sat. Jul 19th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे: मालमत्ता कर भरण्यावर सवलतीसाठी PMC ने मुदत ७ जुलैपर्यंत वाढवली; आतापर्यंत ₹१,२४४ कोटींचा महसूल जमा

Jul 1, 2025
मालमत्ता कर भरण्यावर सवलतीसाठी PMC ने मुदत ७ जुलैपर्यंत वाढवलीमालमत्ता कर भरण्यावर सवलतीसाठी PMC ने मुदत ७ जुलैपर्यंत वाढवली

पुणे महापालिकेने मालमत्ता कर सवलतीसाठीची अंतिम मुदत ७ जुलै २०२५ पर्यंत वाढवली असून आतापर्यंत ₹१,२४४ कोटींचा कर जमा झाला आहे.

सायली मेमाणे

पुणे १ जुलै २०२५ : पुणे महानगरपालिकेने (PMC) मालमत्ता कर भरणाऱ्या नागरीकांसाठी दिली जाणारी ५% किंवा १०% सूट मिळविण्याची अंतिम मुदत ७ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२५–२६ साठी पूर्ण कर भरणाऱ्या मालकांना ही सवलत मिळणार असून ही मुदत पूर्वी ३० जून होती.

PMC च्या माहितीप्रमाणे, १ एप्रिल ते ३० जून २०२५ दरम्यान एकूण ७,१०,५५३ मालमत्ता धारकांनी आपला कर भरून तब्बल ₹१,२४४.५० कोटी महसूल PMC च्या तिजोरीत जमा केला आहे. ही रक्कम पुण्याच्या महानगर विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

PMC च्या कर संकलन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सुविधेसाठी ३० जूनची अंतिम मुदत वाढवून ७ जुलै करण्यात आली आहे. नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर कर भरणे आवश्यक आहे.”

या कालावधीत सर्व नागरी सुविधा केंद्रे दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत खुले राहणार आहेत. याशिवाय, अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारेही कर भरण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध आहे.

PMC ने नागरिकांना या मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत कर भरण्याचे आवाहन केले आहे. शेवटच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

https://newsdotzmarathi.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%89

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune