Marathi Actor Abhijit Kelkar यांनी अलिबागच्या किहीम येथे आपलं स्वप्नातलं घर उभारण्यास सुरुवात केली आहे. कधी वडिलांचा अभिनयाला विरोध होता, आज अनेक कलाकारांकडून मिळतेय कौतुक.
सायली मेमाणे
पुणे 30 जून २०२५ :मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकर याने आपल्या आयुष्यातील एक मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. कधी वडिलांचा अभिनयाच्या निर्णयाला विरोध असताना, आज अभिजीत अलिबागच्या किहीम परिसरात स्वतःचं टुमदार बंगला बांधतोय. तो सोशल मीडियावर या नवीन प्रवासाची झलक शेअर करताच चाहते आणि सहकलाकारांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
मेहनतीची फळं मिळाली
अभिजीत केळकरने अनेक मराठी मालिकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेने त्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्येही तो झळकला. अभिनयाबरोबरच सामाजिक मुद्द्यांवर तो सोशल मीडियावर सक्रियपणे आपली भूमिका मांडतो.
किहीम-अलिबागमध्ये होत आहे घराचं स्वप्न साकार
अभिजीतने सोशल मीडियावर त्याच्या नव्या घराच्या बांधकामाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत त्याने “संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, तोच आपल्याला मजबुत करतो आणि खरं यश तिथूनच मिळतं” असं सांगितलं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने “तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा” असंही लिहिलं आहे.
या व्हिडिओत दिसणाऱ्या घराच्या परिसरात भरपूर मोकळी जागा असून, स्विमिंग पूलसाठी विशेष जागा राखून ठेवलेली आहे. अजून घराचं बांधकाम सुरू असून, हे एक भव्य आणि टुमदार निवासस्थान असणार आहे.
कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
या व्हिडिओवर अभिनेत्री सुकन्या मोरे यांनी “घर कुठे बांधतो आहेस?” असा प्रश्न विचारला होता. यावर अभिजीतने “किहीम अलिबागला” असं उत्तर दिलं. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने “अभी एक नंबर… खूप खूप अभिनंदन, Proud of you” अशी कमेंट केली. अभिनेत्री पल्लवी वैद्य, मुग्धा गोडबोले, सोनाली खरे, हर्षदा खानविलकर, मेघना एरंडे यांसारख्या अनेक कलाकारांनीही त्याचं अभिनंदन केलं.
अभिनयाच्या सुरुवातीला वडिलांचा विरोध
करिअरच्या सुरुवातीला अभिजीतला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्याच्या वडिलांचा विरोध सहन करावा लागला. पण वेळेनंतर त्याच्या कामाचं कौतुक झालं आणि वडिलांनाही त्याचा अभिमान वाटू लागला. आज अभिजीतच्या यशस्वी प्रवासाने अनेक संघर्ष करणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळते.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter