कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0
कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुण्यातील फ्यूएल बिझनेस स्कूलच्या पहिल्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि आत्मनिर्भर भारताबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले

सायली मेमाणे

पुणे १७ सप्टेंबर २०२५ : पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कौशल्य विकास, शिक्षण आणि रोजगार निर्मिती हाच आत्मनिर्भर भारताचा खरा पाया असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. पुण्यातील फ्यूएल बिझनेस स्कूलच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे रोजगार निर्मिती आणि त्या पार्श्वभूमीवर सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे ही एक अद्वितीय उपक्रमशीलता आहे. यामुळे युवकांचे जीवनमान सुधारत असून भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे.

या कार्यक्रमात फ्यूएल शिक्षण संस्था समूहाचा १९ वा वर्धापन दिन देखील साजरा करण्यात आला. वन व्हिजन, वन मिशन आणि स्किल्ड नेशन या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यात २०० विद्यार्थ्यांना सीएसआर शिष्यवृत्ती व पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी फ्यूएलचे अध्यक्ष आणि सीईओ डॉ. केतन देशपांडे, चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोप्पी, सीओओ मयूरी देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नितीन गडकरी यांच्या हस्ते फ्यूएल बिझनेस स्कूलमध्ये पीजीडीएम (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स) अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फ्यूएल आणि कॅपजेमिनी यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. सीएसआर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम लीडरशिप अवॉर्ड देण्यात आला. या पुरस्कारांमध्ये सुदिप्ता पॉल, वामशी मुथ्थापू, सुमीत शहा, रेखा पिल्ले, रिया वैद्य, धनश्री पागे, बिना बलदोटा, शिल्पाश्री आणि अर्पणा पांडे यांचा समावेश होता.

यावेळी गडकरी म्हणाले की, जल, जमीन आणि जंगल यांचा संतुलित विकास होणे गरजेचे आहे. ज्या प्रकारे शहरे स्मार्ट होत आहेत, त्याच प्रकारे भविष्यात आपली गावे स्मार्ट करण्याची आवश्यकता आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. परदेशात फार्मसी आणि नर्सिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र कुशल मनुष्यबळाचा अभाव जाणवतो. सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यासाठी सक्षम बनत आहेत आणि यामुळे सहकार, समन्वय आणि संवादातून कौशल्याधारित स्टार्टअप संस्कृती वाढीस लागली आहे. तंत्रज्ञान, संशोधन आणि ज्ञान या त्रिसूत्रीचा वापर करूनच देशात व्यापक रोजगार निर्मिती शक्य होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

डॉ. केतन देशपांडे यांनी या प्रसंगी सांगितले की, सोशल आंत्रप्रेन्युअरशिपची चळवळ उभी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु आज ७८ कॉर्पोरेट कंपन्यांच्या पाठिंब्यामुळे एक नवे शिक्षण मॉडेल सर्वांसमोर आणता आले आहे. काळाच्या बदलत्या गरजेनुसार आता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीची आवश्यकता भासू लागली असल्याचेही ते म्हणाले.

या दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेवर पुन्हा एकदा भर देण्यात आला. नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेला आत्मनिर्भर भारताचा संदेश युवकांसाठी प्रेरणादायी ठरला. फ्यूएलसारख्या संस्थांच्या माध्यमातून शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण मिळाल्याने उद्योजकता वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed