Pune Crime : कॉलेजमध्ये प्रवेश यादीवरून वाद; तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण

0
कॉलेजमध्ये प्रवेश यादीवरून वाद; तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण

कॉलेजमध्ये प्रवेश यादीवरून वाद; तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण

पुणा कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश यादी पाहण्यावरून वाद झाला आणि त्यात एका तरुणावर लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल.

सायली मेमाणे

पुणे ३ जुलै २०२५ : पुण्यातील पुणा कॉलेजमध्ये अकरावीच्या प्रवेश यादीच्या अनुषंगाने वाद निर्माण होऊन एका तरुणावर लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना, शैक्षणिक संस्थेतच विद्यार्थ्यांमध्ये हा हिंसाचार घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. लष्कर पोलीस ठाण्यात या प्रकरणी ७ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपी ओळखीचे आहेत, तर दोन इसम अनोळखी आहेत. पोलिसांनी कलम 118(1), 115(2), 352, 189(2), 189(4) अंतर्गत कारवाई केली आहे.

या घटनेबाबत इरफान मोहम्मद हुसेन करणुल (वय ३१, राहणार युनिटी पार्क, मलिकनगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा पुणा कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेला होता. प्रवेश यादी नुकतीच प्रसिद्ध झाली होती आणि ती पाहण्यासाठी संबंधित तरुण कॉलेजमध्ये गेला होता. यादी पाहताना काही व्यक्तींशी वाद झाला आणि तो वाद इतका वाढला की, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काहींनी त्याच्यावर तसेच तक्रारदार इरफान यांच्यावर लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी बांबूने डोक्यावर आणि अंगावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तक्रारदारही जखमी झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, शैक्षणिक क्षेत्रातील सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. कॉलेजच्या आवारात अशा प्रकारचा हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून संबंधित आरोपींविरोधात पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शाळा आणि कॉलेज प्रशासनानेही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed