Pune Crime: आयुर्वेदीक सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; स्वारगेट पोलिसांची कारवाई

0
आयुर्वेदीक सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; स्वारगेट पोलिसांची कारवाई

आयुर्वेदीक सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; स्वारगेट पोलिसांची कारवाई

पुण्यातील मुकुंदनगर-गुलटेकडी परिसरात आयुर्वेदीक सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांनी उघड केले. कारवाईत एका पीडित महिलेची सुटका झाली असून सेंटरच्या मालकिणीवर गुन्हा दाखल.


सायली मेमाणे

पुणे २१ सप्टेंबर २०२५ : पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. आयुर्वेदीक सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून सेंटरची मालक व मॅनेजर कविता आनंद शिंदे (वय 38, रा. पुणे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदनगर-गुलटेकडी परिसरात “दिया आयुर्वेदीक सेंटर” या नावाने मसाज सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र या सेंटरच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. खात्री करण्यासाठी पथकाने बनावट ग्राहक पाठवला असता, तेथे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक विशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकात तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, अजय राणे, किशोर भुजबळ व महिला कर्मचारी वैशाली खेडेकर यांचा समावेश होता. पथकाने सेंटरवर छापा टाकत एका महिलेला मुक्त केले. पोलिस हवालदार इमानखान नदाफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कविता शिंदे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शहरात अशा प्रकारचे मसाज, स्पा किंवा आयुर्वेदीक सेंटरच्या आडून अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. आरोग्यसेवेच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांकडून वेळोवेळी छापे टाकले जातात व पीडित महिलांची सुटका केली जाते.

या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी बेकायदेशीर धंद्यांबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील विविध स्तरांमधून अशा प्रकारच्या घटनांवर संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: आरोग्यसेवा केंद्रांच्या आडून बेकायदेशीर धंदा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे उदाहरण असून, गुन्हे शाखेच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे एका महिलेला वाचविण्यात यश आले आहे. पुण्यातील नागरी समाज आणि स्थानिक प्रशासनाने अशा बेकायदेशीर कृतींवर कठोर पावले उचलावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed