Pune Crime: वेटरकडून हॉटेल मालकाचा चाकूने खून; दारू पिऊन कामावर आल्याचा वाद ठरला कारणीभूत

0
Pune Crime: वेटरकडून हॉटेल मालकाचा चाकूने खून; दारू पिऊन कामावर आल्याचा वाद ठरला कारणीभूत

Pune Crime: वेटरकडून हॉटेल मालकाचा चाकूने खून; दारू पिऊन कामावर आल्याचा वाद ठरला कारणीभूत

पुण्यातील पिकॉक गार्डन अँड रेस्टॉरंटमध्ये वेटरने हॉटेल मालकाचा चाकूने खून केला. दारू पिऊन कामावर आल्याचा जाब विचारल्याने वाद वाढला आणि घटनेने शहरात खळबळ माजली.

सायली मेमाणे

पुणे २७ ऑगस्ट २०२५ : पुणे : “दारू पिऊन कामावर येऊ नको” अशी ताकीद दिल्याचा राग धरून वेटरने हॉटेल मालकावर चाकूने सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार बुधवारी (२७ ऑगस्ट) रात्री एनडीए रस्त्यावरील पिकॉक गार्डन अॅन्ड रेस्टॉरंट येथे घडला.

  • खून झालेल्या हॉटेल मालकाचे नाव संतोष सुंदर शेट्टी (वय 45) असे आहे.
  • आरोपी वेटरचे नाव उमेश दिलीप गिरी (वय 39, रा. पिकॉक गार्डन स्टाफ क्वॉर्टर) असून उत्तमनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार :

  • आरोपी गिरी गेल्या 22 दिवसांपासून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
  • तो दारू पिऊन कामावर आल्याने मालक शेट्टी यांनी त्याला ताकीद दिली: “दारू प्यायची असेल तर कामावर यायचे नाही.”
  • यावरून दोघांमध्ये वाद झाला. गिरीने पगार मागितला; मात्र शेट्टी यांनी “तू आधीच अडीच हजार रुपये घेतले आहेत, मग पगार कसा द्यायचा?” असे स्पष्ट सांगितले.
  • त्यामुळे चिडलेल्या गिरीने भटारखान्यातील चाकू उचलून शेट्टी यांच्या मानेवर वार केले.

गंभीर जखमी अवस्थेत शेट्टी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी उमेश गिरी याला अटक केली आहे.

सध्या उत्तमनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed