मोक्याच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट 4 ने आवळल्या मुस्क्या

पुणे येरवडा: घरफोडी व जबरी चोरी प्रकरणात आरोपी शशांक आंबिके ताब्यात, पोलीस कारवाई
पुणे विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल मोक्याच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट 4 ने आवळल्या मुस्क्या आरोपी शशांक ऊर्फ बटल्या शंकर आंबिके ताब्यात.
झोएब शेख
पुणे २२ सप्टेंबर २०२५ : पुणे शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, वाहन चोरी आणि जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी आज येरवड्यात विशेष पोलीस कारवाई करण्यात आली.पो. हवा. अमजद शेख,पो.अं.देविदास वांढरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी नामे शशांक उर्फ बटल्या अंबिके हा देश प्रेमी गार्डन महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा पुणे येथे येणार आहे.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे यांना दिली असता, त्यांनी तत्काळ कायदेशीर कारवाईसाठी मार्गदर्शन केले. पोलीस टीमने लुंबनी गार्डन जवळ सापळा रचून आरोपीची वाट पाहत थांबले. काही वेळाने, बातमीतील वर्णनातील व्यक्ती गार्डनजवळ येताना दिसली आणि २०:४० वाजता आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीसाठी विचारणा केल्यावर त्याने स्वतःचे नाव शशांक ऊर्फ बटल्या शंकर आंबिके, वय २५ वर्षे, रा. एल-३८, नागपुर चाळ हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे, असे सांगितले.
चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की, त्याचे बाबत येरवडा पोलीस स्टेशनकडून माहिती घेतली असता, त्याचे विरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नंबर.३७८/२०२५ भा.न्या. सं.कलम.११८(२),११८(२), १९०,१९३(१)२२३,२७०,३५३(२) आर्म ॲक्ट ४(२५) म. पो. का. कलम ३७ (१)(३) सह १३५ क्रि. लॉ ३ व ७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यास पुढील कारवाई करिता वैद्यकीय तपासणी करून विमानतळ पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter