राहुल गांधींना ‘तो’ व्हिडिओ डिलीट न करण्याचा आदेश द्यावा; सात्यकी सावरकरांची कोर्टात धाव

0
राहुल गांधींना ‘तो’ व्हिडिओ डिलीट न करण्याचा आदेश द्यावा; सात्यकी सावरकरांची कोर्टात धाव

राहुल गांधींना ‘तो’ व्हिडिओ डिलीट न करण्याचा आदेश द्यावा; सात्यकी सावरकरांची कोर्टात धावराहुल गांधींना ‘तो’ व्हिडिओ डिलीट न करण्याचा आदेश द्यावा; सात्यकी सावरकरांची कोर्टात धाव

राहुल गांधी यांनी २०२३ मध्ये लंडनमधील भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद पुन्हा चिघळला. सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट न करण्याची मागणी केली आहे.

सायली मेमाणे

पुणे ११ सप्टेंबर २०२५ : पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे निर्माण झालेला वाद न्यायालयात पोहोचला असून या भाषणाचा व्हिडिओ आजही युट्यूबवर उपलब्ध असल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल करून या व्हिडिओवर मनाई आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. त्यांच्या मते, राहुल गांधी यांनी केलेले भाषण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे आणि बदनामीकारक आहे. त्यामुळे मानहानीची याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आदेश द्यावा की व्हिडिओ युट्यूबवरून डिलीट केला जाऊ नये किंवा काढून टाकू नये, अशी त्यांची मागणी आहे.

पुणे पोलिसांनी या संदर्भात अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीला समन्स पाठवून तांत्रिक तपास सुरू केला होता, परंतु त्याचा अहवाल अद्याप न्यायालयात सादर झालेला नाही. त्यामुळे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की तो अहवाल विश्रामबाग पोलिसांकडून मागवावा आणि त्याचबरोबर राहुल गांधींना आदेश द्यावेत की भाषणाचा व्हिडिओ डिलीट होऊ नये.

या अर्जावर राहुल गांधींच्या वकिलांनी हरकत घेतली आहे. अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात मांडले की खटला सध्या सुनावणीच्या टप्प्यात आहे आणि या टप्प्यावर पोलिसांकडून अहवाल मागवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. हा खटला फौजदारी प्रकारात मोडतो, दिवाणी खटला नाही. त्यामुळे न्यायालयाला युट्यूबवरील व्हिडिओ डिलीट करू नका असे आदेश देण्याचा अधिकारच नाही. म्हणून सात्यकी सावरकर यांचा अर्ज चुकीचा असून कायद्याच्या तरतुदींनुसार तो फेटाळला पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद होता.

या अर्जावर पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात राहुल गांधी आणि सावरकर यांच्यावरील वाद चर्चेत आला आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षात हे प्रकरण आणखी रंगत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच दरम्यान, या प्रकरणात आणखी एक वळण आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलाने पुण्यातील न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच यू-टर्न घेतला. त्यांनी स्पष्ट केले की राहुल गांधींना न विचारता हा अर्ज दाखल करण्यात आला होता आणि राहुल गांधी यांनी स्वतः त्या अर्जाशी तीव्र असहमती व्यक्त केली आहे. त्यामुळे गुरुवारी न्यायालयात दाखल केलेला अर्ज मागे घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

या घडामोडींमुळे सध्याचा वाद अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. एका बाजूला सात्यकी सावरकर न्यायालयाच्या माध्यमातून बदनामीकारक वक्तव्याविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या बचाव पक्षाकडून कायदेशीर मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे हा खटला केवळ न्यायालयीन चौकटीत मर्यादित न राहता तो आगामी काळात राजकीय वादळाला देखील कारणीभूत ठरेल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed