पुणे विमानतळ परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा सिरियल आरोपी जेरबंद; 245 CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांची मोठी कारवाई

0
पुणे विमानतळ परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा सिरियल आरोपी जेरबंद; 245 CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांची मोठी कारवाई

पुणे विमानतळ परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा सिरियल आरोपी जेरबंद; 245 CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांची मोठी कारवाई

पुणे विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात मोठी कारवाई. 245 CCTV फुटेज तपासून आरोपी सागर सोनवणे अटकेत; पाच गुन्ह्यांची कबुली.

पुणे १३ डिसेंबर २०२५ : पुणे शहरातील विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गंभीर प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. लोहगाव येथील गणेश पार्क परिसरात दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 624/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 74, 75 तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, कारण यापूर्वीही विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत अशाच स्वरूपाचे विनयभंगाचे गुन्हे घडल्याचे समोर आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने अत्यंत शिस्तबद्ध आणि तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला.

तपासादरम्यान घटनास्थळ तसेच आरोपीच्या संभाव्य हालचालींच्या मार्गावर असलेल्या विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी आणि भोसरी परिसरातील तब्बल 245 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या व्यापक सीसीटीव्ही विश्लेषणातून आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. सागर राम सोनवणे (वय 22 वर्षे, व्यवसाय चालक, रा. हनुमान कॉलनी, भोसरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत एकूण पाच विनयभंगाचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही अशा स्वरूपाचे गुन्हे केल्याचे त्याने मान्य केले आहे. आरोपी रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यांवर महिलांची छेडछाड करून मोटारसायकलवरून पळ काढत असे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत न येण्यासाठी विशेष काळजी घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत झाले असून, पोलिसांची सतर्कता आणि तांत्रिक तपासाची क्षमता अधोरेखित झाली आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed