Pune News: SpiceJet विमानातील डाएट कोकमध्ये धातूचे तुकडे; प्रवाशाच्या घशाला इजा

0
Pune News: SpiceJet विमानातील डाएट कोकमध्ये धातूचे तुकडे; प्रवाशाच्या घशाला इजा

Pune News: SpiceJet विमानातील डाएट कोकमध्ये धातूचे तुकडे; प्रवाशाच्या घशाला इजा

गोवा-पुणे SpiceJet विमानात डाएट कोकच्या कॅनमध्ये तीक्ष्ण धातूचे तुकडे आढळले, प्रवाशाच्या घशाला इजा; स्पाइसजेट, कोकाकोला व प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई नाही.

सायली मेमाणे

पुणे २१ सप्टेंबर २०२५ : पुणे: गोवा ते पुणे या SpiceJet (SG1080) विमानातील प्रवासादरम्यान अभिजीत भोसले यांच्यासोबत धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान विमानात दिलेल्या डाएट कोकच्या कॅनमध्ये तीक्ष्ण धातूचे तुकडे असल्याचे लक्षात आले, ज्यामुळे अभिजीत भोसले यांच्या घशाला गंभीर इजा झाली. विमानातून उतरल्यावर त्वरित रुग्णवाहिकेतून त्यांना रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते. त्यातील एक लहान तुकडा अभिजीत भोसले यांच्या हातात आला, परंतु कृ मेंबरने तो कॅन जबरदस्तीने हिसकावून कचऱ्याच्या डब्यात टाकल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात प्रवाशाने सांगितले की, हा पुरावा नष्ट केल्याने गंभीर धोका निर्माण झाला आणि हा फक्त त्यांच्या बाबत नाही तर प्रत्येक प्रवाशासाठी गंभीर समस्या ठरू शकते.

अभिजीत भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी स्पाइसजेट, कोकाकोला इंडिया, डीजीसीए, एफएसएएसएआय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे वारंवार तक्रार केली आहे. तरीही अद्याप कोणतीही ठोस आणि पारदर्शक कारवाई झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशाला घशात तीव्र वेदना जाणवल्या आणि श्वास घेण्यास त्रास झाला, ज्यामुळे त्वरित वैद्यकीय मदत आवश्यक होती.

ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून प्रत्येक प्रवाशासाठी गंभीर धोका निर्माण करणारी असल्याचे भोसले यांनी म्हटले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

यापूर्वी मुंबई विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर त्याचे बाह्यचाक निखळले होते. या कारणास्तव विमानाचे आपत्कालीन लॅंडींग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर करण्यात आले. या आपत्कालीन परिस्थितीत सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि मोठा अनर्थ टळला.

स्पाइसजेट विमानातील कोक कॅनमधील धातूच्या तुकड्यांची घटना आणि त्याआधीच्या विमान चाकाच्या समस्येने प्रवाशांमध्ये चिंता निर्माण केली आहे. यातून प्रवाशांची सुरक्षितता, एअरलाइन आणि खाद्य-पेय उत्पादकांच्या जबाबदाऱ्या यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. अभिजीत भोसले यांनी हे प्रकरण जाहीर करत प्रशासनाकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेने प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे की, विमान प्रवासात दिल्या जाणाऱ्या सर्व खाद्य व पेय पदार्थांची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. तसेच एअरलाइन आणि उत्पादकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उच्चतम मानके पाळणे गरजेचे आहे.

भोसले यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकरणांवर तातडीने कारवाई न केल्यास प्रवाशांचा विश्वास विमानसेवेवर कमी होईल आणि भविष्यात या प्रकारच्या अपघाताची शक्यता वाढू शकते. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि एअरलाइन प्रशासनाकडे तातडीने तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed