व्यवसायातून राजकारणाकडे! विक्रम काकडेंच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली १५३ कोटींची संपत्ती

0
व्यवसायातून राजकारणाकडे! विक्रम काकडेंच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली १५३ कोटींची संपत्ती

व्यवसायातून राजकारणाकडे! विक्रम काकडेंच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली १५३ कोटींची संपत्ती

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रातून भक्कम आर्थिक साम्राज्य उघड; पुणे, मावळ आणि दुबईतील मालमत्तांची माहिती समोर

पुणे ०४ जून २०२६ : : पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार विक्रम काकडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची भक्कम आर्थिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी समोर आली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार काकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर तब्बल १५३ कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेल्या विक्रम काकडे यांनी पुणे, मावळ आणि दुबई येथे मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. दुबईतील सुमारे ७.६६ कोटी रुपये किमतीची आलिशान सदनिका, पाषाण येथील निवासी मालमत्ता, मुंढवा आणि मावळ परिसरातील भूखंड यांचा त्यांच्या मालमत्तेमध्ये समावेश आहे.

प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, काकडे यांनी विविध व्यक्ती, कंपन्या आणि व्यावसायिक संस्थांना ४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम आगाऊ किंवा कर्ज स्वरूपात दिली आहे. यामध्ये जय पवार यांना देण्यात आलेल्या १० कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेचीही नोंद आहे. याबाबत काकडे यांनी ही रक्कम जमीन व्यवहारासाठी दिलेला आगाऊ भरणा असल्याचे स्पष्ट केले आहे.

विविध बँक ठेवी, शेअर्स, बाँड्स, म्युच्युअल फंड गुंतवणूक तसेच उच्च मूल्याच्या वाहनांमधील गुंतवणूक यामुळे काकडे यांची आर्थिक विविधता अधोरेखित होते. प्रतिज्ञापत्रातून दीर्घकालीन गुंतवणूक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मजबूत उपस्थितीही स्पष्ट होते.

राजकारणात सक्रिय भूमिका स्वीकारल्यानंतर प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या विक्रम काकडे यांच्याकडे आर्थिक व्यवस्थापन, रिअल इस्टेट विकास आणि व्यावसायिक अनुभवाची भक्कम पार्श्वभूमी असल्याचे समर्थकांचे मत आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांची आर्थिक, सामाजिक आणि संघटनात्मक ताकद कितपत प्रभावी ठरते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed