कल्याण पूर्वेत खड्डयांमुळे रस्त्यांची दुरावस्था; महेश गायकवाडांनी केडीएमसीला दिला इशारा

कल्याण पूर्वेत खड्डयांमुळे रस्त्यांची दुरावस्था; महेश गायकवाडांनी केडीएमसीला दिला इशारा
कल्याण पूर्वेतील खड्ड्यांनी रस्त्यांची दुरावस्था गंभीर झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करण्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांना भेट देत तातडीने कारवाईची मागणी केली.
सायली मेमाणे
पुणे २१ ऑगस्ट २०२५ :कल्याण पूर्वेतील नागरिक रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे गंभीर अडचणीत आहेत. खड्ड्यांनी रस्त्यांची स्थिती इतकी खराब झाली आहे की वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसी (कल्याण डोंबिवली महानगरपालिका) अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
महेश गायकवाड यांनी यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून खड्डे बुजवणे आणि रस्ते दुरुस्त करण्याची तातडीची सूचना दिली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, जर रस्त्यांची सुधारणा लवकर झाली नाही, तर वाहनचालकांसह नागरिकांना अपघात आणि अन्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
स्थानिक नागरिकांनी देखील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तक्रारी नोंदवल्या असून, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter