गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! उद्यापासून रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरु, असे आहे नियोजन

1
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News!

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News!

गणेशोत्सव 2025 साठी कोकण रेल्वेचं आरक्षण 23 जूनपासून सुरू होणार; प्रवासाच्या तारखेनुसार तिकीट बुकिंग कधी सुरू होणार ते जाणून घ्या.

सायली मेमाणे

मुंबई २३ जून २०२५ : गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. 23 जूनपासून कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू होणार असून, प्रवाशांना आगाऊ नियोजनासाठी चांगली संधी मिळणार आहे. यंदा बाप्पांचे आगमन 27 ऑगस्ट, बुधवार रोजी होणार आहे, तर त्याआधीचा शुक्रवार, शनिवार आणि रविवार अनुक्रमे 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी आहे.

कोकणातील मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे हा प्रवासाचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय असतो. एसटी किंवा खासगी गाड्यांच्या तुलनेत रेल्वे प्रवास स्वस्त, आरामदायी आणि सुरक्षित असल्याने दरवर्षी या कालावधीत कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी मोठी गर्दी होते. यासाठी भारतीय रेल्वेने खास आरक्षण वेळापत्रक जाहीर केले आहे.

आरक्षणाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • शुक्रवार, २२ ऑगस्टचा प्रवास — आरक्षण सुरु सोमवार, २३ जून
  • शनिवार, २३ ऑगस्ट — आरक्षण सुरु मंगळवार, २४ जून
  • रविवार, २४ ऑगस्ट — आरक्षण सुरु बुधवार, २५ जून
  • सोमवार, २५ ऑगस्ट — आरक्षण सुरु गुरुवार, २६ जून
  • मंगळवार, २६ ऑगस्ट — आरक्षण सुरु शुक्रवार, २७ जून
  • बुधवार, २७ ऑगस्ट — आरक्षण सुरु शनिवार, २८ जून
  • गुरुवार, २८ ऑगस्ट — आरक्षण सुरु रविवार, २९ जून

रेल्वे वेळापत्रक आणि गाडीचे थेट स्थानक पाहण्यासाठी प्रवाशांनी IRCTC Rail Connect App किंवा National Train Enquiry System (NTES) अ‍ॅप वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे अ‍ॅप्स लाईव्ह लोकेशन, मार्गावरील नकाशा, वेळापत्रक आणि थांबे यासारखी माहिती देतात.

आरक्षण करताना गाडी सुरू होणाऱ्या स्थानकाचा दिवस महत्त्वाचा मानावा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला २६ ऑगस्ट २०२५ रोजी १२६१८ हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसने कल्याण ते चिपळूण, खेड किंवा कणकवलीपर्यंत प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी २६ जून २०२५ पासून आरक्षण सुरु होईल.

तसेच, परतीच्या प्रवासासाठी ३ सप्टेंबर २०२५ रोजी १२६१७ एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस किंवा १६३४६ तिरुअनंतपुरम–लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस वापरणार असाल, तर त्याचे आरक्षण ४ जुलैपासून सुरू होईल.

प्रवाशांनी रात्रीच्या गाड्यांसाठी दुसऱ्या दिवसाचे तिकीट बुक करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, गुरुवारी रात्री 11003 दादर–सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करायचा असल्यास शुक्रवारचे तिकीट बुक करावे लागेल.

या गणेशोत्सवात आपल्या कोकणातील गावी सुखरूप आणि वेळेवर पोहोचायचे असेल, तर आरक्षणाच्या तारखा लक्षात ठेवून लवकरात लवकर तिकीट बुकिंग करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! उद्यापासून रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरु, असे आहे नियोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *