माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? अजित पवारांच्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

0
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? अजित पवारांच्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? अजित पवारांच्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

ऑनलाइन रमी खेळल्याच्या वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मंत्रिपद गमावण्याची शक्यता; अजित पवारांनी घेतली विशेष बैठक, महाराष्ट्राचं लक्ष निर्णयाकडे.

सायली मेमाणे

पुणे २९ जुलै २०२५ : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मंत्रिपदाची कुचंबणा होण्याची चिन्हं दिसत आहेत. ऑनलाईन रमी वादामुळे आधीच चर्चेत असलेल्या कोकाटेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात तब्बल अर्धा तासांहून अधिक काळ चर्चा झाली. या बैठकीत अजित पवारांनी कोकाटेंना कडक शब्दांत सुनावल्याची माहिती पुढे येत आहे.

विधानसभेत अधिवेशन चालू असताना कोकाटे ऑनलाईन रमी खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. नंतर नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्याला रमी खेळता देखील येत नाही असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केल्यानंतर ही बाब अधिक गंभीर झाली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवार यांनी कोकाटेंना बोलावून घेतले. बैठक तब्बल ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ चालली. शेतकरी संघटनांचे काही प्रतिनिधी कोकाटेंना संधी द्यावी, अशी मागणी करत अजित पवारांशी संपर्कात होते. मात्र, यावेळी अजित दादांनी “किती वेळा माफ करायचं?” असा संतप्त सवाल करत कोकाटेंना मंत्रिपदावरून पायउतार होण्याचे सूचक संकेत दिले.

कोकाटेंनी आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, याची हमी दिली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ मंत्र्यांनी अजित पवारांना “माणिकराव ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांना एक संधी द्या” असा सल्ला दिला असल्याचेही समजते. त्यामुळे आता कोकाटेंना माफ करून पुन्हा संधी दिली जाणार की मंत्रिपद जाईल, हे स्पष्ट होणार अजित पवारांच्या अंतिम निर्णयावरच.

राजकीय वर्तुळात यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीत याचे काय परिणाम होतील, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed