मी पुन्हा आलेय! स्मृती इराणीचा ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’मधून कमबॅक, प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मी पुन्हा आलेय! स्मृती इराणीचा ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’मधून कमबॅक
‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या नवीन सीझनसाठी स्मृती इराणी पुन्हा तुलसीच्या भूमिकेत परतली असून, प्रोमोमधील तिचा संवाद “मी पुन्हा आलेय” सध्या चर्चेत आहे.
सायली मेमाणे
पुणे ८ जुलै २०२५ : हिंदी मालिकांच्या इतिहासात अजरामर ठरलेली ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका आता नव्या सीझनसह परत येत आहे आणि याच मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेतील तुलसी ही भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी यांनी तब्बल दोन दशकांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केल्याची अधिकृत घोषणा झाली आहे.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला प्रोमो आणि त्यातील “मी पुन्हा आलेय” हा संवाद विशेष लक्ष वेधून घेतो आहे. स्मृती इराणी यांनी परिधान केलेली पारंपरिक साडी, गळ्यातील मंगळसूत्र, मोजके दागिने आणि मोठं कुंकू असलेला तुलसीचा लूक पुन्हा पाहायला मिळाल्याने प्रेक्षक nostalgi मध्ये गेले आहेत.
मालिकेच्या प्रोमोमध्ये एका हॉटेलमध्ये काही जण मालिकेबद्दल गप्पा मारताना दिसतात, आणि स्मृती इराणी राजकारणात असल्याने त्या पुन्हा मालिकेत येतील का, याबद्दल संभाषण होते. त्यानंतर थेट स्मृती इराणीची एंट्री होते आणि त्या म्हणतात, “गेल्या २५ वर्षांपासून प्रेक्षकांशी माझं नातं घट्ट होतं, त्यामुळे आता मी पुन्हा आलेय…” हा संवाद सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
एकीकडे स्मृती इराणी केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद भूषवत असताना त्याच वेळी मालिकेत पुनरागमन करणे हे निश्चितच उल्लेखनीय ठरते. त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांचं स्वागत करत असून, अनेकांनी #TulsiReturns आणि #SmritiIrani ट्रेंड सुरु केले आहेत. ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’ चा हा नवीन सीझन कोणत्या नव्या वळणावर नेईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter