मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 : सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 MW वीज निर्मितीचे लक्ष्य

0
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 : सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 MW वीज निर्मितीचे लक्ष्य

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 : सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 MW वीज निर्मितीचे लक्ष्य

सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत महाराष्ट्रात सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हास्तरीय यंत्रणांना वेगाने काम करण्याचे दिले आदेश.

सायली मेमाणे

पुणे ३१ जुलै २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही आपली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे स्पष्ट केले असून सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधित यंत्रणांना कामांमध्ये कोणतीही दिरंगाई न करता गतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार, ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक यंत्रणांनी खासगी व शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

जिल्हास्तरीय टास्क फोर्सना सुद्धा वेळोवेळी कामाचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. विकासकांना येणाऱ्या अडचणींना त्वरित प्रतिसाद देणे, ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवणे, अतिक्रमण हटवणे, आणि आवश्यकतेनुसार रस्त्यांची पुनर्बांधणी करणे यावर भर दिला जात आहे. सौर प्रकल्पाच्या साहित्याची चोरी झाल्यास पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी अशी सूचना करण्यात आली आहे.

वन विभागाच्या जमिनीवर प्रकल्पांकरिता आवश्यक असणाऱ्या परवानग्या वेळेत देण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. ग्रामपंचायतींकडून ना-हरकत प्रमाणपत्रे घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे असेही सांगण्यात आले. विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये योजना राबवताना जनतेच्या हिताची आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की सौर कृषी वाहिनी योजना 2.0 द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होईल, वीजेवरील खर्चात बचत होईल, तसेच हरितऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर राहील. सौर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी भाडेपट्टा देणे, सीमांकन करणे, आणि जमीन मोजणीसारखी कामे जलदगतीने पार पाडण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले.

या बैठकीत वित्त, वन, ग्रामविकास आणि ऊर्जा विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. सौर कृषी वाहिनी योजना 2.0 द्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि राज्याच्या ऊर्जाक्षमतेच्या दृष्टीने मोठी झेप घेतली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed