बारामतीतील रयत शिक्षण संस्थेत अश्लील नाच; व्हायरल व्हिडिओने निर्माण केला संताप

0
बारामतीतील रयत शिक्षण संस्थेत अश्लील नाच; व्हायरल व्हिडिओने निर्माण केला संताप

बारामतीतील रयत शिक्षण संस्थेत अश्लील नाच; व्हायरल व्हिडिओने निर्माण केला संताप

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या मयुरेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या अश्लील नाचाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

सायली मेमाणे

पुणे १८ ऑगस्ट २०२५ : बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात मे महिन्यात आयोजित केलेल्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त मनोरंजनाच्या कार्यक्रमात अश्लील नाचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये डान्सर अश्लील हावभाव करत असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला असून, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे संस्थेचा कारभार पाहतात. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण मिळालं असून, विरोधकांकडून या व्हिडिओला धरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्थानिकांनी सांगितले की, ग्रामपंचायतीकडे स्वतंत्र मैदान नसल्यामुळे गावच्या ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त मनोरंजनाचे कार्यक्रम वर्षानुवर्षे या विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले जातात. या परंपरेला स्थानिकांनी समर्थन दिले आहे.

या घटनेनंतर रयत शिक्षण संस्थेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित डान्सर्स आणि आयोजकांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed