रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे: दि. ०५/०५/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार योगेश थोपटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोहगाव परिसरातून चोरीस गेलेली दुचाकी एक इसम आर.के. चौकाजवळील मोकळ्या मैदानात घेऊन थांबला आहे.
सदर माहिती तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ पथकासह सापळा रचून संशयित इसम मुनान सत्तार अन्सारी (वय ३४, रा. लोहगाव, पुणे) यास चोरीच्या अॅक्टीव्हा दुचाकीसह ताब्यात घेतले. अधिक चौकशीअंती विमानतळ पोलीस स्टेशन येथे याच दुचाकीबाबत गुन्हा रजिस्टर नंबर २०२/२०२५ भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडे अधिक तपास करताना त्याच्याकडे एक बुलेट मोटारसायकल देखील आढळून आली. सदर बुलेटची माहिती घेतल्यावर ती काळाचौकी पोलीस स्टेशन, मुंबई येथून चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत एकूण १,८०,००० रुपये किंमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, सराईत गुन्हेगाराकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ श्री. हिंमत जाधव, तसेच सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु क-हे, गिरीश नाणेकर आणि रुपेश तोडेकर यांच्या पथकाने केली.
तपास सुरू असून, आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.