रिपोर्टर : झोहेब शेख
विमानतळ पोलिसांनी दाखल केलेल्या चोरीप्रकरणी आरोपी दीपक पपाले यास एक वर्ष तीन महिने सश्रम कारावास आणि ५००० रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दि. १४/०५/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ९५/२०२४, भारतीय दंड विधान कलम ३८० (घरफोडी/चोरी) अंतर्गत आरोपी दीपक देविदास पपाले (वय ३५ वर्षे, रा. सर्व्हे नंबर १२, बनसोडे चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. विजय चंदन यांनी अत्यंत कौशल्याने करून दोषारोपपत्र मा. अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीवरचा गुन्हा सिद्ध झाल्याने, मा. न्यायालयाने भारतीय दंड प्रक्रिया संहिता कलम २४८ (२) नुसार एक वर्ष तीन महिने सश्रम कारावास आणि ५०००/- रुपये रोख दंड अशी शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याचा तपास पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यामध्ये मा. श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त), मा. श्री. रंजन कुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त), मा. श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त – पूर्व प्रादेशिक विभाग), मा. श्री. हिंमत जाधव (पोलीस उपायुक्त – परिमंडळ ०४), आणि श्रीमती प्रांजली सोनवणे (सहाय्यक पोलीस आयुक्त – येरवडा विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले.
तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय संकेश्वरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आशालता खापरे, पोलीस हवालदार श्री. रुपेश पिसाळ यांचा मोलाचा सहभाग होता. न्यायालयीन प्रक्रियेसाठी कोर्ट अंमलदार श्री. प्रशांत माटे यांनी काम पाहिले.